विडणी सोसायटीच्या सभासदांना विविध सुविधा पुरवीत असताना सोसायटीच्या माध्यमातून पेट्रोल पंप, मंगल कार्यालय सुरु करण्याचा आपला मानस आहे. विविध शासकीय योजनेचा सर्व सभासदांना लाभ मिळावा हे आपले प्रथम उदिष्ट राहील : सरपंच सागर अभंग
नुकत्याच झालेल्या विडणी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विडणी विकास आघाडीला मतदारांनी भरघोस पाठिंबा देत विजयश्री मिळवून दिली होती. त्यामुळेच केवळ अडीच महिन्याच्या कालावधी मध्येच राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून विडणी गावच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी मिळवण्यात आपल्याला यश प्राप्त झाले आहे. तालुक्यातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या विडणी विकास सोसायटी निवडणूकीत सभासदांनी विडणी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्यास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांच्या हिताला प्राधान्य देत सर्वांगीण प्रगती साधता येईल असा आशावाद विडणीचे लोक नियुक्त सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केला. ते विडणी विकास सोसायटी निवडणूकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी उत्तरेश्वर मंदिर, विडणी (फलटण ) येथे बोलत होते.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपा फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल नाळे, माजी चेअरमन माऊली नाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सरपंच सागर अभंग म्हणाले की, विडणी सोसायटीच्या सभासदांना विविध सुविधा पुरवीत असताना सोसायटीच्या माध्यमातून पेट्रोल पंप, मंगल कार्यालय सुरु करण्याचा आपला मानस आहे. विविध शासकीय योजनेचा सर्व सभासदांना लाभ मिळावा हे आपले प्रथम उदिष्ट असल्याचे सांगून पारदर्शक कारभार करीत अल्पावधीतच ग्रामपंचायती सारखाच सोसायटीचाही कामाचा चढता आलेख राहिल अशी ग्वाही यावेळी सरपंच सागर अभंग यांनी दिली.
यावेळी विडणी विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण हरिभाऊ अब्दागिरे, सुभाष हरिभाऊ अभंग, सदाशिव दाजी कदम, धनाजी गेनबा काळुखे, सतीश दिनकर घाडगे, यशवंत जयवंत टिळेकर, गणेश चंद्रकांत नाळे, हिरामण आप्पा शेंडे, सौ. कल्पना विक्रम पवार, सौ. रुक्मिणी हरिभाऊ राऊत, सायबू नाना जगताप, सुरज विठ्ठल नाळे, बाळासाहेब बाबा कोकरे, यांच्यासह चंद्रकांत नाळे, नंदकुमार अभंग, अनिल कदम, सोपानराव ननावरे, नारायण अभंग, बाबासाहेब अदलिंगे, शरद नाळे, प्रमोद अब्दागिरे, संजय कोकरे, किसन टिळेकर, सुरेश मुळीक, किशोर जगताप, सोमनाथ पवार, सतीश पवार, काशिनाथ अभंग, सौरभ जगताप, नचिकेत जगताप, मोनू जगताप, केशव नाळे, सनी पवार, युवराज अभंग, किरण गाडे, बाबासाहेब कोकरे, बापूराव नाळे, हेमंत शिंदे, गणेश काळूखे अण्णा काळुखे सुरेश पवार हेमंत पवार अमोल पवार, सचिन पवार, कृष्णा शेंडे, सुरेश नाळे, पंकज नाळे, विशाल शिंदे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पंकज शिंदे, लालासो अदलिंगे, शांतीलाल शिंदे, पांडुरंग अभंग, हणमंत नाळे सर, प्रमोद अब्दागिरे, उत्तम टिळेकर, युवराज टिळेकर, आंनदराव टिळेकर, राजेंद्र शिंदे, दत्तात्रय शिंदे, दिलीप अभंग, मंगेश शेंडे, शरद शेंडे, मारुती इंगळे, बाळासाहेब अभंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन गजानन अभंग, लता तुषार अभंग, मनीषा दिपक नाळे, जयश्री राजेंद्र शिंदे, उपस्थित होते.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, बजरंग गावडे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी उत्तरेश्वर मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली नाळे यांनी केले तर आभार कृष्णा बंडू शेंडे यांनी मानले.