फलटण | धैर्य टाईम्स |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्ष समिती 2025 च्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त फलटण येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्ष समिती 2025 चे सदस्य सुरज काकडे, अजय काकडे, सिद्धार्थ अहिवळे, भूषण बनसोडे, कपिल काकडे, मंगेश सावंत, चंद्रकांत मोहिते, केतन सोरटे, गोविंद काकडे आणि गणेश अहिवळे आदी मान्यवर उपस्थित होते.