सातारा शहरात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून या गुन्ह्यांमध्ये चारजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहरात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून या गुन्ह्यांमध्ये चारजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बांधकाम पाडत असताना झालेल्या वादातून दोघांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महेश प्रभाकर शिंदे, सरिता महेश शिंदे यांच्याविरुध्द शेवंता आत्माराम शिंदे (तिघे रा. रविवार पेठ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 1 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दुसर्या घटनेत पैसे उसने मागितल्यानंतर ते न दिल्याने चिडून जावून मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. धीरज वाडकर, सुशांत सावंत (दोघे रा.सातारा) यांच्याविरुध्द मंगेश अरुण नाईकनवरे (वय 20, रा.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.











