कराडातील सायकलीस्ट व उत्तम ट्रेकर, गुळाचे अडत व्यापारी सुहास श्यामराव पाटील (वय ५२) यांचा घारेवाडीचा धुळोबा डोंगरात ट्रेकींग करतानाच आज सकाली सातच्या सुमारास दुर्देवी मृत्यू झाला.
कराड : कराडातील सायकलीस्ट व उत्तम ट्रेकर, गुळाचे अडत व्यापारी सुहास श्यामराव पाटील (वय ५२) यांचा घारेवाडीचा धुळोबा डोंगरात ट्रेकींग करतानाच आज सकाली सातच्या सुमारास दुर्देवी मृत्यू झाला.
पवार यांच्यासहीत सात ट्रेकर्स तो डोंगर सर करत असताना त्यांना ह्रदयाचा तीव्र धक्का बसला. तोल सावरतानाच ते कोसळले. त्यांच्या सोबतच्या ट्रेकर्सनी प्रंसगवाधन राखून शहरातू मदतीला आलेल्या ४० हून अधिक ट्रेकर्सच्या मदतीने रूग्णालयात हलवले मात्र रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पाटील यांचे निधन झाले. पाटील यांच्या निधनाने शहरातील ट्रेकर्ससहीत व्यापाऱ्यांमध्येही शोकाकूल वातावरण पसरले आहे.
सुहास श्यामराव पाटील हे ट्रेकींगसाठी गेले होते. घारेवाडी मंदीराजवळ वाहने लावून डोगर सर करत असतानाच पाटील यांना ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला. तोल सावताना पाटील कोसळले. काय होतय कळाच्या आतच पाटील यांच्या नाक व तोंडातून रक्त आले अन् निपचीप झाले. तेथील ट्रेकर्सनी त्यांना सावरत शहरातून अन्य ट्रेकर्सना मदतीसाठी कॉल केले. शहरातून तब्बल ४० हून अधिक ट्रेकर्स काही वेळातच तेथे पोचले. त्यांनी शिडीला बांधून त्यांना खाली आणले. त्यांना रूग्णवाहीकेतून कृष्णा रूग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे रूग्णालायतून सांगण्यात आले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
पाटील गुळाचे अडत व्यापारी म्हणून शहरात प्रसिद्ध होते. त्यांचे येथील मार्केट यार्डात त्यांचे अडत दुकानही आहे. त्यासहीत पाटील उत्तम ट्रेकर्स व सायकलीस्ट म्हणून शहरात माहितीचे आहेत. त्यांनी वैष्णदेवी ते श्रीखंड कैलास सायकलींगने प्रवास केला आहे. नवरात्रीत साकलवरून कोल्हापूरला ते आंबाबाईच्या दर्शनालाही जावून आले होते. त्यांनी परिसरातील अनेक गड व डोगरातही ट्रेकींग पूर्ण केले आहे. त्यासह कराड ते वैष्णोदेवी व पुन्हा कराड अशा चालत परिक्रीमा यात्रा यशस्वी पूर्ण केली होती. कराड ते रायगड, कराड ते कोल्हापूर सायकल ट्रेकही पूर्ण केला आहे. कैलास खडतर यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली.