फलटण( प्रतिनिधी ) माजी निवृत्त सहाय्यक फौजदार बाळासाहेब साहेबराव गायकवाड (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांचे ते वङील होत. पोलीसांतील माणूस म्हणून त्यांनी विशेषतः लोणंद, शिरवळ, खंङाळा, वाई आदी ठिकाणी काम केले होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंङे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मु.पो पळशी ता.कोरेगाव जि.सातारा येथे उशीरा राञी करण्यात आला असून सावङणे आणि दहावा विधी बुधवार दिनांक २९ रोजी पळशी येथे सकाळी ९ वाजता होणार आहे.
त्यांच्या निधनबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले.











