Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल

भाजपची सातारा पालिकेसाठी बांधणी सुरू

टीम : धैर्य टाईम्स
BJP starts planing for Satara Municipality
सातारा शहरात भाजपच्या 131 बूथ कमिटी आहेत. या कमिटीच्या माध्यमातून नियुक्त वॉर्ड प्रमुखांनी राज्य कार्यकारिणीला राजकीय बांधणीचा अहवाल सादर करावयाचा आहे, अशा स्पष्ट सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीत केल्या.

सातारा : सातारा शहरात भाजपच्या 131 बूथ कमिटी आहेत. या कमिटीच्या माध्यमातून नियुक्त वॉर्ड प्रमुखांनी राज्य कार्यकारिणीला राजकीय बांधणीचा अहवाल सादर करावयाचा आहे, अशा स्पष्ट सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीत केल्या.

सातारा शहरातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीने प्रत्येक वार्ड साठी एका प्रभारीची नियुक्ती केली आहे. या प्रभारींनी आपल्या वॉर्डचा पूर्ण अभ्यास करून भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीकडे अहवाल सादर करायचा आहे. वॉर्ड प्रभारींची बैठक शासकीय विश्रामगृहात  पार पडली.
या बैठकीत बोलताना शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कामाचा आढावा घेतला. तसेच 2014 पासून आज पर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मतांची टक्केवारीत वाढ झाली असे सांगितले. त्याचप्रमाणे 2016 च्या इलेक्शन मध्ये 31 ठिकाणी उमेदवार उभे केले आणि नऊ ठिकाणी उमेदवार मिळाले नव्हते. परंतु आताची परिस्थिती खूपच चांगली आहे. आपल्याला सर्व प्रभागात सर्व वार्डात सर्व कॅटेगिरीचे उमेदवार मिळतील, अशी खात्री व्यक्त केली. कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना सांगितली. त्याचप्रमाणे करोनाच्या महामारी मध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी केलेले काम लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेची हीच अपेक्षा असल्याचे सांगितले. कार्यकारिणी सदस्य अमित कुलकर्णी व सुवर्णा पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले की, सातारा शहरात भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रकारचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असतात. साताऱ्यातील परिस्थिती खूप चांगली आहे. मा. प्रदेशाध्यक्षांनी पण हे मान्य केले आहे आणि सर्वांनी मिळून काम केले तर आपल्याला अवघड काहीच नाही, फक्त पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करावे तिकीट मिळाले तर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत तिकीट मिळाले नाही तर पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे. लवकरच या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी च्या कोअर कमिटीची नेमणूक केली जाईल, साताऱ्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाला कळविल्या जातीलच परंतु भारतीय जनता पार्टी, सातारा शहर नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढेल यावर सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काम करावे.

यावेळी नेते दत्ताजी थोरात, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, नगरसेविका सिद्धी पवार, प्राची शहाणे, सातारा ग्रामीण चे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा शहर चे सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, वैशाली टंकसाळे,चिटणीस रवी आपटे, नजमा बागवान, आघाड्या मोर्चाचे अध्यक्ष व वॉर्ड प्रभारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER