Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या सूचनांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेतले जातील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण, दि.13 :  शासनातर्फे पत्रकारांना देण्यात येणारी वैद्यकीय मदत व ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारा सन्मान निधी याची व्याप्ती वाढवून शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या सूचनांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेतले जातील असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिले.

सातारा जिल्ह्यातील दरे (ता.महाबळेश्‍वर) येथील निवासस्थानी सातारा - जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ व महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे तज्ज्ञ संचालक विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांबाबत सविस्तर चर्चा करुन राज्यातील पत्रकारांच्या महत्त्वाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले त्यावेळी ते बोलत होते. या चर्चेमध्ये ‘लोकवृत्त’ (सातारा) चे संपादक सुजित आंबेकर, ‘ए.बी.पी.माझा’चे सातारा जिल्हा प्रतिनिधी राहुल तपासे, पत्रकार संतोष नलवडे यांनीही सहभाग नोंदवला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, युवा उद्योजक अक्षय गवळी उपस्थित होते.

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधून पत्रकारांना देण्यात येणारी वैद्यकीय मदतीची रक्कम सध्याच्या वैद्यकीय खर्चानुसार अतिशय तुटपुंजी असून त्यामध्ये भरघोस वाढ करण्यात यावी. तसेच ज्येष्ठ निवृत्त पत्रकारांना देण्यात येणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीमधील मानधन यामध्येही दरवर्षी वाढ होईल यापद्धतीने कार्यवाही व्हावी. तसेच निवृत्त पत्रकार निधन पावल्यानंतर त्याचे मानधन त्यांच्या वारसास (फक्त पती/पत्नीस) हयात असेपर्यंत मिळण्याची तरतूद करावी, निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांच्या आरोग्याबाबतीतल्या सर्व तपासण्या व त्यानुसारची औषधे मोफत मिळण्यासाठी नजिकच्या ‘आपला दवाखाना’मध्ये सोय करावी इत्यादीसाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये किमान रुपये 1 हजार कोटी रुपयांची कायमस्वरुपी ठेव निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी हा निधी स्वायत्त विश्‍वस्त संस्था असल्यामुळे यातील तरतुदीनुसार विविध औद्योगिक कंपन्यांच्या सी.एस.आर. फंडातून शासनाने रक्कम उभी करावी अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, ‘‘या सर्व मागण्या व सूचनांबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल’’, असे सांगितले.

‘‘पत्रकारांनी शासनाच्या विविध सामाजिक लाभाच्या योजनांची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर केल्यास या योजनांचे लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. अर्थात हे करत असताना शासनाच्या धोरणामध्ये काही कमतरता असेल तर तीही सकारात्मक पद्धतीने पत्रकारांनी शासनाच्या निदर्शनास आणली पाहिजे’’, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हास्तरावरील लघु वृत्तपत्रांच्या संपादकांच्या विविध मागण्याही यावेळी रविंद्र बेडकिहाळ व विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांच्यापुढे सविस्तरपणे सांगितल्या. ‘‘त्याबाबत आपण लवकरच राज्यस्तरीय जिल्हा वृत्तपत्रांच्या संपादकांशी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी निश्‍चितपणे वेळ देवू’’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

‘‘राज्यशासन वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांबाबत सकारात्मक आहे. पत्रकारांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेले विविध निर्णय योग्य आहेत. तथापी, पत्रकारांच्या सर्वच मागण्यांबाबत विधीमंडळामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे लवकरात लवकर समिती नेमून त्यामध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांबाबत कायमस्वरुपी दीर्घ लाभाचे धोरण मुख्यमंत्र्यांनी घ्यावे’’, अशी विनंती आ.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी केली.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या विस्तारासाठी व पोंभुर्ले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासनाने विशेष तरतुद करुन ते गाव पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे, असे यावेळी विनोद कुलकर्णी व सुजित आंबेकर यांनी सूचवले. त्याबाबतही, ‘‘तसा प्रस्ताव त्वरित सादर करावा. आपण त्यात सकारात्मक लक्ष घालू’’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER