कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देतो, असे सांगून सातारा व सांगली जिल्ह्यातील 28 जणांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात मकरंद वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देतो, असे सांगून सातारा व सांगली जिल्ह्यातील 28 जणांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात मकरंद वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघ हा शासकीय नोकर नसताना तो शासकीय नोकर आहे, असे सांगून त्याने सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय मदत मिळवून देतो, असे भासवले. एवढेच नव्हे तर आमची अठराजणांची टीम आहे, असे तो वारंवार सांगत होता. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. प्रत्येकाकडून वाघ याने 430 रुपये घेतले, असे सुमारे 12 हजार 900 रुपये त्याने उकळले. हे पैसे त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वीकारले असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लोकांच्या लक्षात येताच नागरिकांनी त्याला पकडून सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर 420 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











