सातारा दि. 1 : सातारा शहरामध्ये दि. 3 सप्टेंबर रोजी हिल हाफ मॅरेथॉन -2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा शहरातील अंतर्गत वाहतूकीचे नियम व वाहनाचे पार्किंग करण्यासाठी पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार दि. 3 सप्टेंबर 2023 चे सकाळी 5 वा. पासून सकाळी 11 वा. पर्यंत या कालावधीत पुढीलप्रमाणे सातारा शहरातील अंतर्गत वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरता बदल केला आहे.
दैनंदिन वाहतूकीचे बंदी घालण्यात येणारे मार्ग : पोलीस परेड ग्राऊंड येथे सुरुवात होवून पोवई नाका-मरीआई कॉम्प्लेक्स-शाहु चौक-अदालत वाडा रोड मार्गे-समर्थ मंदिर-बोगदा-यवतेश्वर-प्रकृती हेल्थ रिसॉर्ट पासून वळून परत त्याच मार्गाने समर्थ मंदिर-अदालत वाडा- नगरपालिका - शाहू चौक- मरिआई कॉम्प्लेक्स- पोवई नाका मार्गे पोलीस परेड ग्राऊंड हा मार्ग रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमक दलाची वाहने वगळून सर्व वाहनांना स्पर्धा कालावधीमध्ये प्रवेश बंद राहील.
वरील नमूद कालावधी करिता वाहतूक मार्गातील बदल : शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी. बी. कदम मार्केट- राधिका सिग्नल येथून सातरा शहरात ये - जा करतील.
बॉम्बे रेस्टॉरंन्ट चौकातून सातारा शहरात येणारी सर्व वाहने जिल्हा परिषद - कनिष्क हॉल चौक - रिमांड होम मार्गे- जुना आर.टी. ओ. चौक अथवा बांधकाम भवन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौक - मुथा चौक- रिमांड होम मार्गे- सुभाषचंद्र बोस चौक मार्गे सातारा शहरात ये-जा करतील.
मुख्य बसस्थानक –राधिका सिग्नल- तहसिल कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्गकडे जाणारी सर्व वाहने ही ग्रेड सेपरेटर मार्गाने सातारा शहराच्या बाहेर जातील.
सज्जनगड, ठोसेघर, परळी कडून येणारी - जाणारी सर्व वाहने ही शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोडने शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी.कदम मार्केट-राधिका सिग्नल येथून सातारा शहरात ये-जा करतील.
कास बाजूकडून सातारा शहर बाजूकडे येणारी सर्व वाहने मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यत प्रकृती हेल्थ रिसॉर्ट बाजु कडून सातारा बाजूकडे येणार नाहीत. ती पर्यायी मार्गाने एकीव फाटा -एकीव -मोळेश्वर- कुसुंबीमुरा -कुसुंबी- मेढा मार्गे सातारा शहराकडे येतील.
पार्किंग : हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेकरिता येणारे स्पर्धकांनी व नागरिकांनी आपली वाहने ही प्रशासकीय इमारतीच्या समोरील मोकळ्या मैदानामध्ये, कलेक्टर ऑफिस ते जिल्हा परिषद ग्राऊंड रस्त्यांचे दोन्ही बाजुस, जुना आर. टी. ओ. चौक ते सुभाषचंद्र बोस चौक, करंजेनाका जाणारे रोडवर दक्षिण बाजुस लावतील. तरी वरील वाहतूकीतील बदलाची नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी केले आहे.