Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

बांबू लागवड अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा - नंदकुमार वर्मा

टीम : धैर्य टाईम्स

सातारा, दि.14  : जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत बांबू लागवड अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना मनरेगाचे मिशन महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बांबू लागवड अभियान मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी श्री. वर्मा यांनी या सूचना केल्या.

यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी विजय यादव, राजेंद्र शहा, संजीव कर्पे यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, वन व कृषि विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे सांगून श्री. वर्मा म्हणाले, बांबू पिकाचा समावेश आता गवत वर्गीय वनस्पतीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता बांबूची तोडणी ही करता येते व ते जाळताही येतात. तसेच नवीन धोरणानुसार आता औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये किमान 60 टक्के जैविक इंधनाचा वापर बंधनकारक करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये बांबूची मागणी वाढणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. यंत्रणांनी शेतकऱ्यांना याचे फायदे समजावून सांगण्यासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

 श्री. वर्मा पुढे म्हणाले, पर्यावरणामध्ये कार्बनचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी जैविक इंधनाचा वापर ही काळाची गरज आहे. त्यासाठी जैविक इंधनाची उपलब्धताही तितकीच महत्वाची आहे. बांबू हे जैविक इंधन म्हणून महत्वाची वनस्पती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवून त्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच बांबूपासून मिळणारे उत्पन्न हे ऊसाच्या उत्पन्नाप्रमाणेच आहे. त्याला पाणीही कमी लागते. त्यामुळे पाण्याची बचत होण्यासही मदत होणार आहे. याशिवाय फक्त जाळण्यासाठी नाही तर बांबूचा वापर अगरबत्ती, फर्निचर या उद्योगांमध्येही होतो. हे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी एकत्र काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सुरुवातीला जिल्ह्यातील नदी काठच्या शेतांमध्ये बांबू लागवड करावी असे सांगून शेतकरी नेते श्री. पटेल म्हणाले, बांबूचे बेट तयार होते. त्याला तंतूमुळ असते त्यामुळे जमिनीची धूप थांबवण्यास त्याचा फयदा होतो. कोयना धरणाच्या बुडित क्षेत्राच्या बाजूने बांबूची लागवड केल्यास धरणामध्ये येणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी बांबू लागवड हा एक चांगला पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांना किमान 20 एकर बांबू लागवडीचे उद्दीष्ट देण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, बांबू लागवडीची जिल्ह्यात सुरुवात झाली असून येत्या वर्षभरात त्याविषयीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल. या उद्दीष्टीविषयी दर आठवड्याला आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती यादव यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात बांबू लागवडीविषयी सुरू असलेल्या कामांविषयी माहिती सादर करताना जिल्ह्याला 27 हजार 500 हेक्टर बांबू लागवडीचे उद्दीष्ट असून त्यामध्ये जिल्हा परिषद – 10 हजार, वन विभाग व सामाजिक वनीकरण – 10 हजार आणि कृषि विभागास 7 हजार 500 हेक्टर या प्रमाणे उद्दीष्ट असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात सध्या 16 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर काम सुरू असल्याची माहिती दिली.  

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER