Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात

तालुक्याची वकीली करणारा अवलिया वकील : ॲड. नरसिंह निकम

टीम : धैर्य टाईम्स

जनता हाच आपला पक्ष व त्यांची सेवा हाच आपला धर्म मानून कोणताही राजकीय स्वार्थ नबाळगता सत्ताधाऱ्यांवर आपल्या बुद्धी कौशल्याने अंकुश ठेऊन खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावून अन्यायावर पेटून उठणारे व्यक्तिमत्व म्हणजे फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम. ६ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त क्रांतिकारी योद्धा म्हणून ज्यांची समाजात वेगळी ओळख आहे असे ॲड. नरसिंह निकम यांच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर व जबर इच्छाशक्तीच्या आधारे ॲड. नरसिंह निकम यांनी स्वतःची खास प्रतिमा तयार केली आहे. बलाढ्य राजकीय शक्तीविरूद्ध लढताना तसूभरही आपल्या ध्येयापासून विचलीत न होता 'सत्य' हेच 'अंतिम ध्येय' ठेवून कोणताच राजकीय तह ॲड. नरसिंह निकम यांनी कधीच केली नाही. खरे तर हीच त्यांची खरी ताकद व जमेची बाजू.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मातीतून कर्तबगार माणसे घडविली. महाराजांनी मूठभर मावळे हाताशी धरून स्वराज्याची स्थापना केली. परंतु त्यांनी प्रथम माणसे घडविली व नंतर किल्ले बांधले. सेना व आरमार उभे केले. खरे तर ॲड. नरसिंह निकम यांच्याविषयी सुद्धा हेच बोलावेसे वाटते की, ते सुद्धा आज माणसे घडविण्याचे काम करताहेत. राजकीय शक्तीला बळी न पडता त्याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी लोकांना सामर्थ्य देण्याचे काम आज ॲड. निकम करीत आहेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणाऱ्या राजकीय परिस्थितीत जनतेला बोलायला लावून अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याचे काम ॲड. निकम यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम त्यांच्या हातून होत आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आंदोलनाच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ॲड. निकम यांनी वेळोवेळी केले आहे. ऊसाच्या दराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, शहरातील व्यापाऱ्यांचा प्रश्न असेल सुरक्षिततेचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांवर पेटून उठून सर्वांच्यापुढे राहून या प्रश्नांना न्याय मिळवून देताना खऱ्या अर्थाने समाजासाठी झिजण्याचे काम ॲड. नरसिंह निकम यांनी केले आहे.

वकीली व्यवसायातून कोट्याधीश झालेले अनेक वकील आज आपण समाजात पाहतो. परंतु वकीली पेशातून पैशांची अपेक्षा न ठेवता गरीबांना न्याय देवून वकील या नावाला वेगळी उंची ॲड. नरसिंह निकम यांनी प्राप्त करून दिली आहे.

बहुतेक माणसे स्वतःकरीता जगत असतात याचे कारण स्वार्थ हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. इतरांचे जीवन सुखी करण्यासाठी फार थोडी मंडळी न मळलेली वाट शोधतात. ज्या मार्गान फारसे कुणी गेलेले नसते. अशा आडवळणाने जावून स्वतःच्या आयुष्याला जे वळण देतात अशा वळणदार माणसांमध्ये ॲड. नरसिंह निकम यांचे नाव अग्रक्रमाणे घ्यावे लागेल.

स्वार्थाने बरबटलेल्या राजकीय मंडळींना 'निकम झटका' देवून अनेकांना वटनीवर आणण्याचे काम वकीलांनी चोख बजावले आहे. श्रीराम कारखाना जमीन विक्री प्रकरण असेल व अधिकाऱ्यांविषयी उच्च न्यायालयापर्यंतची धाव असेल हे प्रत्येक काम अभ्यासपूर्ण व बारकाईने करण्याचे ॲड. नरसिंह निकम यांचे वेगळे वैशिष्ट्य आहे.

ॲड. नरसिंह निकम यांनी न्यायालयामध्ये फौजदारी व दिवाणी खटले चालविले त्यापेक्षा अधिक काळ त्यांनी आपल्या गावाची व तालुक्याची वकीली केली. न्यायालयात वकीली करताना त्यांनी पक्षकाराशी इमान हे आपल्या व्यवसायाचे ब्रीद मानले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सतत न्याय मिळवून दिला. समाजातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे काम ते जाणीवपूर्वक करतात.

सार्वजनिक जीवनामध्ये सरळमार्गी चालणाऱ्या ॲड. नरसिंह निकम यांना राजकारणातील काही दृष्ट प्रवृत्तींनी अडथळे निर्माण केले. तरीही त्यांनी त्याच जिद्दीने व ताकदीने जनसामान्यांचा पाठींबा मिळवून आपले वेगळेपण सिद्ध केले.

ताठ मानेने कसे जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून ॲड. नरसिंह निकम यांच्याकडे पाहता येईल. खेकड्याची वृत्ती सोडून देण्याची मानसिकता ठेवून व्यापक सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तरच राजकीय वनवासातून सर्वसामान्यांना सुटका आहे हा संदेश ॲड. निकम समाजाला देतात.

ॲड. निकम यांच्या वाढदिनी प्रभूरामचंद्रांकडे एवढेच साकडे की, जनतेच्या या क्रांतीकारी योद्ध्याला उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो व भविष्यात राजकारणातील मोठे यश त्यांना लाभो..

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER