Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

ई - चलन भरले नाही तर वाहन जाईल काळ्या यादीत

वाहनचालकांनी दंडाची रक्कम वेळेत भरणे आवश्यक
टीम : धैर्य टाईम्स
If e-currency is not paid, the vehicle will be blacklisted;
महामार्गावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई करून वाहनधारकांना ऑनलाइन ई - चलन पाठविण्यात येते. मात्र बहुतांशी वाहनधारक  ई - चलन मिळूनही दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनांचा समावेश काळ्या यादीत केला जाणार असून वाहनधारकांनी महाट्रॅफिक ॲपद्वारे आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड किंवा आपले वाहन काळ या यादीत टाकण्यात आलेले आहे का ? याची खात्री करणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड आकारला गेला असल्यास सदरचा दंड वेळेत भरून आपले वाहन काळ्या यादीत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन भुईंज (जोशीविहीर) येथील महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी ' साहस वार्ता ' शी बोलताना केले.

ई - चलन सातारा,
महामार्गावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई करून वाहनधारकांना ऑनलाइन ई - चलन पाठविण्यात येते. मात्र बहुतांशी वाहनधारक 
ई - चलन मिळूनही दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनांचा समावेश काळ्या यादीत केला जाणार असून वाहनधारकांनी महाट्रॅफिक ॲपद्वारे आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड किंवा आपले वाहन काळ या यादीत टाकण्यात आलेले आहे का ? याची खात्री करणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड आकारला गेला असल्यास सदरचा दंड वेळेत भरून आपले वाहन काळ्या यादीत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन भुईंज (जोशीविहीर) येथील महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी ' साहस वार्ता ' शी बोलताना केले.
     सपोनि गुरव पुढे म्हणाले, महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी ' स्पीडगन ' असलेली अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मोबाईल पोलिस व्हॅन महामार्गावर गस्त घालत असते. या मोबाईल व्हॅनद्वारे भरधाव वेगाने वाहन चालवणे, विना सीटबेल्ट वाहन चालविणे, विना इन्शुरन्स, विनापरवाना आणि वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर ई - चलनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते आणि सदरचे ई - चलन हे ऑनलाईन किंवा पोस्टद्वारे वाहनधारकाला पाठवले जाते. तसेच संबंधित वाहनधारकांच्या मोबाईलवर संदेश पाठविला जातो. मात्र बहुतांशी वाहनधारक माहिती मिळूनही सदरचा दंड भरत नसल्यामुळे दिवसेंदिवस वाहनधारकांच्या ई - चलनाद्वारे केलेल्या दंडाच्या रकमेत वाढ होत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र ज्या वाहनधारकांनी महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ई - चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करूनही सदरचे वाहनधारक दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करत असतील, अशा वाहनधारकांच्या वाहनांचा समावेश काळ्या यादीत केला जातो. आपल्या वाहनाचा समावेश का यादीत केला गेले असल्याची कल्पना संबंधित वाहनधारकांना नसते. याची माहिती मिळविण्यासाठी वाहनधारकांनी स्वतःच्या मोबाईलवर महाट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये गाडी नंबर व गाडीक्या चेसी नंबरचे शेवटचे चार अंक टाकल्यावर तुमच्या वाहनावरील कारवाईची व दंडाची माहिती प्राप्त होते. प्रत्येक वाहनधारकांनी याची वारंवार खातरजमा करणे गरजेचे असल्याचे सपोनि गुरव यांनी स्पष्ट केले.
    भुईंज (जोशीविहीर) येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिसांनी महामार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, विना हेल्मेट, विना सीटबेल्ट वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, महामार्गावरील लेन कटिंग करणे, रेड सिग्नल क्रॉस करून जाणे, धोकादायक वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे आणि परवानगी नसताना प्रवाशांची वाहतूक करणे इत्यादी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत एकूण १०५४७ वाहनधारकांच्यावर केसेस करून ३४ लाख ५२ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे, तर जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० अखेर ८३७२२ केसेच्या माध्यमातून ६ कोटी २६ हजार ४० दंड वसूल करण्यात आलेला आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ५४७२३ वाहनधारकांच्या वर केसेस दाखल करून ८४ लाख ९१ हजार ६८९ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे. म्हणजे गेल्या तीन वर्षात महामार्ग पोलिसांच्या कडून महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १ लाख ४८ हजार ९९२ केसेसच्या माध्यमातून वाहनधारकांच्या कडून सुमारे सात कोटी ४४ लाख ५२ हजार ४२९ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

दंडाची रक्कम जमा करण्याचे आवाहन
    ई - चलन प्राप्त झाल्यानंतर त्वरित दंडाची रक्कम भरणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधित वाहनांचा काळया यादीत समाविष्ट करण्यात येणार असून वाहनधारकांनी लवकरात लवकर दंडाची रक्कम जमा करण्याचे आवाहन भुईंज (जोशीविहीर) येथील महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी वाहनधारकांना केले आहे.
              सपोनि दत्तात्रय गुरव
         भुईंज महामार्ग पोलीस केंद्र

तीन वर्षात सुमारे साडेसात कोटी रुपयांचा दंड वसूल
       गेल्या तीन वर्षात महामार्ग पोलिसांच्या कडून महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १ लाख ४८ हजार ९९२ केसेसच्या माध्यमातून वाहनधारकांच्या कडून सुमारे सात कोटी ४४ लाख ५२ हजार ४२९ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER