देशभक्त क्रांतिवीर किसन वीर यांचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश (आण्णा) किसन वीर (वय ८२) यांचे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सातारा येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
वाई : देशभक्त क्रांतिवीर किसन वीर यांचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश (आण्णा) किसन वीर (वय ८२) यांचे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सातारा येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी अतिशय उल्लेखनीय, आदर्शवत व शिस्तबद्ध काम करून दोन्ही संस्थांचा लौकिक वाढविण्यात मोठा वाटा होता.