Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

वाठार स्टेशन येथे आरोग्य महामेळाव्याला नागरिकांचा अपूर्व प्रतिसाद : डॉ विश्वनाथ सरांच्या रूपात गरजूंना आरोग्य संजीवनीचा वरदहस्त

टीम : धैर्य टाईम्स

धैर्य टाईम्स | 17 मार्च 2025 | 

उत्तर कोरेगाव परिसरातील सुप्रसिद्ध बाजारपेठ वाठार स्टेशन आणि परिसरातील १५ गावांचा एकत्रित शिबिर नुकतेच श्री वागदेव विद्यालयात भव्य आरोग्य महामेळावा संपन्न झाला. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण (एमबीबीएस, एमडी मेडिसिन, डिप्लोमा इन इकार्डियोग्राफी) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आरोग्य महामेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य महामेळाव्याने परिसरातील अनेक गरजूंना आरोग्य संजीवनी दिली. या आरोग्य महामेळाव्यात नागरिकांच्या मोफत प्राथमिक आरोग्य तपासण्या, मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी अचूक माहिती मिळाली.

आरोग्य महामेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण सर म्हणाले, "उत्तर कोरेगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमच्या टीमचे परम कर्तव्य आहे. चव्हाणवाडी (फलटण) हे जसे माझे गाव आहे तसेच येथील विखळे हे सुद्धा मी माझेच गाव समजतो कारण ते माझ्या वडिलांचे आजोळ आहे. या आरोग्य महामेळाव्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून माझ्या सर्वच टीमला खूप आनंद झाला. भविष्यातही असे आरोग्य महामेळावे समर्थ वागदेव महाराजांच्या पावनभूमीत आयोजित करून तळागाळातील गरजूंना मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. नागरिकांनी आता आपल्या आजारांपासून स्वतःला मुक्त करून शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर बनून नवी पिढी घडवायची आहे."

आरोग्य महामेळाव्याचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी डॉ. चव्हाण सर आणि त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले. "अशा आरोग्य महामेळाव्यांमुळे आम्हाला आमच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होते. सध्या धान्य काढणीच्या कामांमुळे काही नागरिकांना उपस्थित राहता आले नाही तरी भविष्यात तज्ञ डॉक्टरांच्या बहुमूल्य वेळेचा उपयोग उपयुक्त सामाजिक आरोग्य महामेळाव्यांमधून नक्कीच होईल," अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

या आरोग्य महामेळाव्यात शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी केली. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाली. आरोग्य महामेळाव्यात सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता जाधव (आदित्य हॉस्पिटल, पोवई नाका, सातारा) यांनी महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी ६५% सवलतीत पॅप स्मिअर तपासणीची सुविधा दिली. मात्र, महिलांचा सहभाग आणखी वाढवता आला असता, असे त्यांनी सांगितले. महिलांनी आता गर्भाशय संबंधित समस्यांना आपल्या तज्ञांशी सल्लामसलत करून निवारण करायचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉ. अण्णासाहेब कदम (कदम स्कीन क्लिनिक) यांनी नागरिकांना अशा आरोग्य महामेळाव्यात सहभागी होण्याचे महत्त्व सांगितले, जेणेकरून आजारांची तीव्रता वाढण्यापूर्वीच त्यांना वेळीच रोखता येईल. डॉ. चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे उत्तर कोरेगाव परिसरातील लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच त्वचा रोग व केसांच्या निगडीत आजारांपासून मुक्त होण्याकरिता सातारा जिल्ह्यातील आधुनिक तंत्रज्ञान कदम स्कीन क्लिनिक येथे उपलब्ध आहे, त्याचा नागरिकांनी सवलतीत जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घ्यावा, असे आवाहन केले.

प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व श्री. गणेश चव्हाण यांनी वाठार स्टेशन परिसरातील लोकांना अशा उच्चशिक्षित तज्ञांच्या ज्ञानकौशल्य अनुभवाचा निश्चितच भविष्यात फायदा होणार आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व डॉक्टरांचा सत्कार व अभिनंदन केले.

आरोग्य महामेळाव्याचे उद्घाटन वाठार स्टेशनच्या सरपंच सौ. सीमा गणेश चव्हाण आणि श्री. गणेश चव्हाण, श्री. महेश गांधी, श्री. अभिजीत निकम यांनी तज्ञांसह दीपप्रज्वलन करून केले. एमक्यूअर फार्माचे हेड मॅनेजर श्री. अमोल बारटक्के, टेरिटरी मॅनेजर श्री. मोहम्मद अली मुलाणी, एमजे फार्माचे मॅनेजर श्री. इरफान शेख, सिप्ला फार्माचे हेड मॅनेजर श्री. वैभव पवार, मॅनेजर श्री. अभिजीत शिंदे, युनिडस् हेल्थकेअर फार्माचे श्री. सोमनाथ माने आणि सौ. शीतल पवार (वाठार हेल्थ स्टेशन आणि महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी क्लिनिक व्यवस्थापक) यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक आणि रुग्ण उपस्थित होते.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER