फलटण प्रतिनिधी :
फलटण बस स्थानकात एसटीमध्ये एका महिलेची पर्स लंपास करून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या, दिनाक ११ रोजी सकाळी १०:२० वाजण्याच्या सुमारास फलटण एस टी स्टॅड येथुन फिर्यादी
सौ सिमा ज्ञानेश्वर शिरतोडे (रा.शिवाजी चौक रविवार पेठ फलटण) या फलटण ते बारामती बसमध्ये चढल्या होत्या त्यावेळी फिर्यादी यांनी पिशवी मध्ये ठेवलेली काळ्या रंगाची पर्स त्यामध्ये
३ हजार रूपये किमतीचे अंदाजे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान ८ मनी मोठे ४ मनी व दोन वाट्या, २० हजार रूपये किमतीचे अंदाजे अर्धा तोळा वजनाची सोन्याची चैन त्यात बदाम, २ हजार रूपये किमतीचे अंदाजे ३ भाराचे चांदीचे पैजन एक जोड, ३०० रूपये किमतीच्या चांदीच्या ४ मासोळ्या व ११ हजार ५०० रूपये रोख रक्कम अशी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सौ. सिमा शिरतोडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पो. हवा फरांदे हे करीत आहेत.