यवतेश्वर, ता. सातारा येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात दि. ५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता यवतेश्वर गावच्या हद्दीतील झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : यवतेश्वर, ता. सातारा येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात दि. ५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता यवतेश्वर गावच्या हद्दीतील झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
आकाश प्रकाश शिंदे (रा. अंबिका नगर, इंदापूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप विनायक भोसले (वय ३७, रा. अनावळे, ता.सातारा) हे दुचाकीवरून कासहून साताऱ्याकडे येत होते. तर याचवेळी समोरून साताऱ्याहून कासकडे निघालेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये भोसले यांचा पाय फ्रॅक्चर झाला तर दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातानंतर भोसले यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आकाश शिंदेवर गुन्हा दाखल केला. तपास हवालदार चव्हाण हे करीत आहेत.











