Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी

अपराजित रामराज्य

टीम : धैर्य टाईम्स

वाल्मिकी रामायणातील युद्धकांडात रामराज्याचे वर्णन आहे. येथे महर्षि वाल्मीकि यांनी रामराज्याचे महत्त्व आणि श्रेष्ठता दर्शविली... ते लिहितात 

रामो रामो राम इति प्रजानामभवन् कथाः ।

रामभूतं जगाभूद्रामे राज्यं प्रशासति ॥ ६-१२८-१०३

श्रीराम राज्य करत असताना, लोककेंद्रित राम, राम, राम अशी चर्चा होते. जग रामाचे जग झाले.

फलटण : सचिन मोरे, 9284246026

राजकारणात येण्यापूर्वीच फलटणच्या विकासाच जे स्वप्न पाहिलं होतं, ते डोळ्यासमोर प्रत्यक्ष साकार होत असताना तालुक्याची सत्ता चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ नये याकरीताच आपण रणजितसिंह यांना जाहीर विरोध करत असल्याची भूमिका रामराजे यांनी घेतली. महायुतीतील एक वरिष्ठ नेते असूनही भाजपा उमेदवाराला ठामपणे विरोध करणे भविष्यातील राजकारणाला किती घातक ठरू शकते, हे माहित असूनही रोखठोक भूमिका घेऊ शकतात ते फक्त रामराजेच. गेल्या 34 वर्षाचा सक्रिय राजकारणाचा अनुभव असणारे रामराजेंना कुठे थांबायचं हे नक्की कळतं त्यामुळे आपणाला तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नसल्याचे त्यांनी जाहिर करून एक प्रकारे येणाऱ्या निवडणूकीतील वेगळे संकेत दिलेत हे मात्र नक्की. अशा धाडशी निर्णय क्षमतेमुळेच रामराजेंची 34 वर्षाची सत्ता अबाधित राहिली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या व जिंकल्या. या लढायांचं वैशिष्ट्य म्हणजे एका लढाईतील डावपेच पुन्हा कधीच दिसला नाही प्रत्येक लढाईत नवीन युद्धनितीचा वापर शिवाजी महाराज करतात. राजकीय कौशल्य वापरताना अगदी हेच सूत्र रामराजे वापरताना दिसतात म्हणूनच श्रीमंत रामराजे यांना अपराजित राजकीय योद्धा म्ह्टले तर वावगे ठरू नये. 

फलटणचे नगरसेवक ते विधान परिषदेचे सभापती हा राजकीय प्रवास तेवढाच कठीण व धाडसचा आहे. खरे तर राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे रामराजे रमले ते फलटणच्या राजकारणा भोवतीच. त्याला कारणही तसेच आहे. फलटण,खंडाळा, माण व कोरेगाव या तालुक्यातील जनतेसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पिढ्या पाण्यासाठी संघर्ष करत होत्या. हा पाण्यासाठीचा संघर्ष संपला तरच आपल्या राजकीय जीवनाला किंमत आहे हे रामराजे ओळखून होते. त्यामुळे राजकारणातील अनेक धाडसी निर्णय रामराजे यांनी घेतले. अपक्ष आमदार असूनही महायुतीच्या सत्तेत राजकीय कौशल्य वापरून कृष्णा - खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेले यश हेच खरे रामराजे यांच्या राजकीय जीवनाला मिळालेली कलाटणी होय. 

पाण्याविना करपलेल्या जमिनी सारखी माणसांची झालेली दशा, पाण्यासाठी टाहो फोडणारी जनावरे तर प्रसंगी पावसाच्या थेंबासाठी डोळ्यातील आसवांचे थेंबही सुकून गेलेली माणसे वाचण्याचं कसब फक्त रामराजेच जाणो. म्हणूनच की काय संपूर्ण राजकीय जीवन याच पाण्याच्या प्रश्नासाठी खर्ची घातले. त्यामुळे याच पाण्याचे मोल जाणणारी जनता रामराजे यांच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभी आहे हे वेगळे सांगायला नकोच. 

1976 मध्ये केंद्रीय कृष्णा लवादाच्या बच्छाव आयोगाने, महाराष्ट्र सरकारला कृष्णा नदीतून महाराष्ट्राच्या वाट्याचे कर्नाटकात वाहून जाणारे 555 टीएमसी पाणी 2000 सालापर्यंत उचलण्याबाबत निर्देश दिले. हा पश्चिम महाराष्ट्रासाठी कठीण व गुंतागुंतीचा प्रश्न सखोल अभ्यास करुन त्याच्यावर दिवस रात्र एक करुन अनेक आमदारांना पाणी प्रश्नावर एकत्र करणे. आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र सरकार यांचा ताळमेळ घालत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा पाण्यासाठीच्या संघर्षाची बाजू मांडणे हे फक्त हाडाचे वकील असणारे रामराजेच करू जाणे. खरे तर रामराजेंनी केलेले हा राजकीय संघर्ष, अनेक पिढ्या फेडता नयेणारे रामराजेंचे उपकार आजही जनता विसरली नाही. त्यामुळेच अपराजित रामराज्य आजही अबाधित आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

90 च्या दशकापूर्वीची फलटणची दशा आणि दिशा कोणाला माहिती असेल तर जरूर विचारा. केवळ राजकीय सत्तेच्या लोभापायी दिशाहीन नेतृत्वाने स्वतःच्या हट्टीपणाने तालुक्याला वेठीस धरले होते. रामराजे यांच्या राजकीय प्रवेशाने जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला हेच प्रत्येक जण सांगेल. 

राजकीय गणित जुळवताना प्रत्येक निवडणुकीत वेगळी रणनीती आखत विरोधकांना मात देण्यात रामराजे नेहमीच यशस्वी झाले आहेत. सलग ६ वेळा विधानसभा निवडणूक एकहाती जिंकत रामराज्य अबाधित ठेवले आहे. परिस्थिती प्रमाणे बदलण्यापेक्षा परिस्थितीला बदलवणे हे राजकीयसूत्र असल्याचे रामराजे यांच्या राजकारणाचे आणखी एक वैशिष्ट्य. प्रत्येक निवडणुकीत याचा प्रत्यय येतोच आहे. येणारी 2024 ची विधानसभेची निवडणूक एक नवीन राजकीय संघर्ष घेऊन आली आहे. यावेळी राजकीय गणितं काहीशी वेगळी असतील. मात्र राजकारणतील "रामाचे" रामराज्य अबाधित राहिल असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण, 'राजकीय तत्त्वज्ञानाचा जनक' प्लेटो म्हणतो, ते राज्य आदर्श आहे, जिथे तत्त्वज्ञ राज्य करतात. ते राज्य कायम अबादित राहते. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER