फलटण प्रतिनीधी :- फलटण तालुक्यात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव सोहळा शनिवार दिनांक १ जून २०२४ रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक सोहळा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर शनिवार दिनांक १ जून रोजी सकाळी ९ वाजता फलटण तालुक्यातील धनगर समाजातील युवक व युवतींची मोटार सायकल रॅली फलटण शहरातून निघणार आहे. तर सायंकाळी ४ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शाही मिरवणूक संपन्न होणार आहे.
खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यातील धनगर समाजाच्या प्रमुख सर्व नेतेमंडळींची व समाज बांधवांची बैठक श्री बिरदेव मंदिर जाधववाडी येथे आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्व समावेशक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव सोहळा मोठया उत्साहात व शाही मिरवणूकीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. या बैठकीला यावेळी भाजप फलटण तालूका अध्यक्ष पै.बजरंग गावडे, महादेव पोकळे,जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, संतोष गावडे, संदीप बुधनवर, विष्णू सुळ, खंडेराव सरक, शेखर खरात, तुकाराम गावडे -पाटील, डॉ. धनंजय आटोळे, युवराज सांगळे, राजू गोफने राहुल रूपनवर, शंकर दडस, विजय भिसे, दादा ढेकळे - पाटील, विष्णू लोखंडे, आदर्श खटके, विलास आटोळे, संतोष सोनवलकर, किरण लाळगे, नितीन कोकरे, आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. फलटण शहर व तालुक्यातील सर्व धनगर समाजातील युवक युवतींनी व समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.