Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

आंतरराज्य मोटार सायकल चोरट्यास अटक

चोरीच्या 16 मोटार सायकल जप्त; कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
टीम : धैर्य टाईम्स
Interstate motorcycle thief arrested
आंतरराज्य मोटार सायकल चोरट्याला ताब्यात घेण्यात कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या 16 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

कराड : आंतरराज्य मोटार सायकल चोरट्याला ताब्यात घेण्यात कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या 16 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
अजित भगवान खरात (वय 19, रा. लेंगरेवाडी, पो. मारूगडे, ता.आटपाडी, जि.सांगली, सध्या रा. उजाला चौकी, सरकेज, अहमदाबाद, राज्य गुजरात) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीने डोके वर काढले होते. मोटार सायकल चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अजीत बोऱ्हाडे, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील व कराड शहर पो.ठाण्याचे वरिष्ठ पेालीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होवून ते उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आलेले होते. हे पथक कराड शहर पो.ठाणे हद्दीत व परिसरात मोटार सायकल चोरांचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार संतोष सपाटे व नितीन येळवे हे कराड शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
त्या माहितीवरून एक संशयीत इसम कराड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेत आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर यांनी कौलशल्यपुर्ण तपास केला असता त्याने एकुण 16 मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. त्या त्याचेकडून जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी याने कराड शहरातून 07, विटा जिल्हा सांगली येथून 03, कासा जिल्हा पालघर येथून 01 तसेच अहमदाबाद राज्य गुजरात येथून 05 अशा एकुण 5 लाख 58 हजार रुपये किंमतीच्या 16 मोटार सायकल चोरल्याचे निष्पन्न झालेले आहे.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी हा एस.टी.बसने वेगवेगळया शहरात जावून बसस्थानक परिसरात लोकांनी पार्क केलेल्या स्प्लेंडर, एचफ डिलक्स व शाईन मोटार सायकल अशा गाड्या टार्गेट करून त्यांचेकडील मास्टर की ने हॅण्डल लॉक काढून चालु करत होता. गाडीची नंबर प्लेट काढून ग्राहक शोधून कोरोना मुळे पेपर ट्रान्स्फर होण्यास वेळ लागत आहे असे सांगून गाड्याची विक्री करत होता. गाड्या चोरून विकून मिळालेल्या पैशातून मौजमजा करत होता.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित बाबर, सहा.पोलीस निरीक्षक कराड शहर पो.ठाणे, पोउपनि अशोक भापकर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, मनोज शिंदे पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, संदीप कुंभार, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER