सातारा दि. 24 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक २६ जानेवारी 2024 सकाळी ९.१५ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ व संचलन समारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा शंभूराज शिवाजीराव देसाई, यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे. तरी सदर समारंभास जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आव्हान जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी, सातारा यांनी केले आहे.
२६ जानेवारी 2024 रोजी छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे सकाळी ९-१५ वाजता होणाऱ्या राष्ट्रध्वजारोहण समारंभ व संचलन समारंभाच्या वेळेस शालेय विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत. त्यांची प्रात्यक्षिके मुख्य परेड नंतर आयोजित केली आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेणेसाठी जास्तीत जास्त नागरीकांना उपस्थित रहाता यावे म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सातारा यांच्यामार्फत जादा स्थानिक बसेस सोडण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमात भाग घेता यावा यासाठी त्या दिवशी सकाळी ८-३० ते १०-०० ही वेळ सोडून शासकीय, अशासकीय कार्यालयाने अथवा संस्थांनी आपला स्वतःचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करावा, असे शासनाचे आदेश आहेत.
तरी या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, अशी विनंती जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी सातारा यांनी केली आहे.