Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

आठवडाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्याला कैद करण्यात वनविभागाला यश

दुसऱ्याचे दर्शन : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम
टीम : धैर्य टाईम्स
Forest Department succeeds in capturing leopard after a week-long effort
येणके, ता. कराड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर  बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच येणके गावामध्येच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

कराड :  येणके, ता. कराड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर  बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच येणके गावामध्येच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
दरम्यान, वनविभागाच्या पथकाकडून विभागातील वनपरिक्षेत्राची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार वनविभागाने येणके परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुमारे तीन ते चार सापळे लावण्यात आले होते.  अखेर शनिवार दि. 26 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या सापळ्यात एक बिबट्या कैद झाला. तत्पूर्वी रविवार दि. 27 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास परिसरात लावलेल्या सापळ्यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यातील एका सापळ्यात बिबट्या कैद झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या बाबतची माहिती तात्काळ अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर तात्काळ वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
तत्पूर्वी, वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबट्या कैद झल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने तात्काळ सापळ्यात कैद झालेल्या बिबट्याला ताब्यात घेऊन अन्यत्र हलवले आहे. सापळ्यात कैद झालेला बिबट्याचा बछडा असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली असून सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या या मोहिमेला यश आले आहे.
मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येणके गावमध्येच ग्रामस्थांना दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाले. येथील येणके-किरपे रस्त्यालगत असलेल्या शेतात काम करण्यासाठी निघालेल्या शेतकरी, युवकांना हा बिबट्या दिसला. त्यामुळे एकीकडे वनविभागाने एका बिबट्याला कैद केल्याचे ग्रामस्थांमध्ये समाधान असतानाच दुसरीकडे त्यात गावात अन्य एका बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहिले आहे.
तालुक्यातील सुपने, तांबवे पाठरवाडी, येणके परिसरात सुमारे तीन ते चार बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. तसेच या भागात  बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले होते. तर शेतात काम करणाऱ्या महिलेसह दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या युवकावरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
त्यातच दि. 15 (सोमवार) नोव्हेंबर रोजी येणके येथे ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर येणके व परिसरातील ग्रामस्थांमधून वनविभागाच्या ढिलाईबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटनांनीही बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी मागणी वनविभागाकडे केली होती. त्यानुसार वनविभागाने लावलेल्या तीन ते चार सापळ्यां मध्ये अखेर एक बिबट्या कैद झाला आहे.
दरम्यान, वनविभागाच्या या कारवाईवर परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, सुमारे तासाभरातच गावामध्ये दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहिले आहे. तसेच वनविभागाने कैद केलेल्या बिबट्याव्यतिरिक्त आज दिसलेल्या दुसऱ्या बिबट्यासह परिसरात अन्य दोन बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक लोकांना बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे त्यांचाही वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणीही स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER