Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

शहीद तुकाराम ओंबळे हे केडंब्याचे नव्हे तर ते देशाचे सुपुत्र : नितीन बानुगडे-पाटील

टीम : धैर्य टाईम्स
Martyr Tukaram Ombale is not the son of Kedambe but the son of the country: Nitin Banugade-Patil
तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.

केळघर : तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.
केडंबे, ता. जावली येथे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी शौर्यदिनाचे औचित्य साधुन श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसगी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील बोलत होते.
प्रारंभी शहीद तुकाराम ओंबळे याच्या प्रतिमेस पुष्पचक्र मान्यवरांच्या हस्ते वाहण्यात येऊन दिपप्रज्वलन करण्यात आले. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला उभे करण्यासाठी १३ वर्षे लागत असतील पण १३ सेकंद कसाबला पकडण्यासाठी उशिर झाला असता तर १६ जणांचे पथक आज राहीले नसते आणि तो कसाब पसार होवुन त्याने आणखीत दहशती हल्ले केले असते. परंतु अंगावर गोळ्यांचा वर्षाव होत असताना, रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना त्या कसाबला मिठी मारणाऱ्या तुकाराम ओंबळेंनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. ते तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.
यावेळी माजी आ. सदाभाऊ सपकाळ, शिवसेना क्षेत्र प्रमुख एस. एस. पार्टे, प्राचार्य प्रमोद घाडगे, प्रांत राजेश टोम्पे, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल माने, सातारा जावली विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, आदिनाथ ओंबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, विजयराव मोकाशी, तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, सचित जवळ, नामदेव बांदल, सचिन मोहीते जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बानुगडे-पाटील म्हणाले, लढणे या रक्ताच्या मातीत आहे. राजासाठी माणस मरत असत. पण राज्यासाठी मरायला छत्रपती शिवरायांनी शिकवल म्हणुन ती परंपरा पुढे सुरु राहीली. या परंपरेचे दैदिप्यमान पर्व म्हणून तुकाराम ओंबळे याच्या शौर्याचा उल्लेख आम्हाला करावाच लागेल. त्यामुळे हा दिवस शोर्य दिवस म्हणुन साजरा करतो आहोत असे सांगुन शहीदांना मिळालेला हा सर्वात मोठा सन्मान आहे असे सांगुन ते होते म्हणून आपण आहोत. त्यांनी १३ सेकंद उशिर केला असता तर चित्र वेगळ दिसल असत, असेही पाटील यांनी सांगितले.
मुंबईवर झालेला हल्ला हा काळा दिवस होता. १० दहशतवाद्यांनी ताज हॉटेल नरिमन पॉइंट ओबरॉय हॉटेल येथे उच्छाद मांडला होता. शिवाजी टर्मिनसवर अंधाधुंद गोळीबारात 30 जण मेले, तर ३०० जण जखमी झाले. ६० तास सुरु असलेल्या दहशती कारवाईत जनता भयभीत होती. अशावेळी रात्री १२.३० वा. दोन अतिरेकी गिरगाव चौपाटीवर स्कोडा गाडीतुन येत असल्याचा मॅसेज मिळताच १६ जणांचे पथक रवाना झाले. त्यामध्ये तुकाराम ओंबळे यांनी छातीवर गोळ्या झेलत इतरांचे प्राण वाचविले आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगा समोर आणला. हा इतिहास पिढीला सांगायचा असेल तर असा छोटेखानी कार्यक्रम होऊन चालणार नाही तर तो शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे मत इतिहास सांगताना बानुगडे पाटलांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी राजेश टोम्पे यांनी स्मारकाच्या जागेचा प्रश्न मिटवला असुन स्मारकाचा प्रश्न लवकरच मिटवीला जाईल. प्रशासन पुर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन यावेळी दिले. विजराव मोकाशी यांनी पत्रकारांनी शासनावर वारंवार आवाज उठविल्याने स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच स्मारकाचा प्रश्न सुटेल मार्गी लागेल असे सांगुन शेती कॉलेजचा प्रस्ताव तयार करून शहीद औबळेंच्या नावाने सुरु व्हावे यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते एस. एस. पार्टे यांनी स्मारकासाठी आम्ही पाच कोटी, दहा कोटी दिले असे खोटे सांगुन जनतेची दिशाभुल करू नका, असे सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER