Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही पर्याय खुले

शिवसेने च्या आमदारांचा राष्ट्रवादीला इशारा
टीम : धैर्य टाईम्स
If we do not follow the lead religion, then we also have options
जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने आघाडी धर्म सोयीस्कर पणे पाळला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावर च लढणार आहे. येथील स्थानिक समीकरणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहेत. राष्ट्रवादीने जर येथे आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सातारा : जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने आघाडी धर्म सोयीस्कर पणे पाळला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावर च लढणार आहे. येथील स्थानिक समीकरणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहेत. राष्ट्रवादीने जर येथे आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष नुकतीच पूर्ण झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने जनहिताचे जे निर्णय घेतले ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे. या अनुषंगाने आयोजित बैठकीनंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार महेश शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते नितीन बानुगडे, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शहर संघटक प्रणव सावंत इ यावेळी उपस्थित होते.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षाच्या वाटचालीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने दोन वर्ष पूर्ण केली. या सरकारने अनेक निर्णय जनहिताचे निर्णय घेतले. करोनाच्या काळात गेल्या दोन वर्षात राज्यशासनाला तब्बल एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला तरीसुद्धा शासनाने सरकारी कर्मचार्यांच्या पगारावर परिणाम होऊ दिला नाही. तब्बल बावीस हजार कोटीची कर्जमाफी, पोलीस कर्मचार्यांना दीडपट अनुज्ञेय महागाई भत्ता, करोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचार्यांना पन्नास लाखांची भरपाई, नागपूर येथे डीएनए परीक्षण प्रयोगशाळा, जिल्हा नियोजन समिती च्या निधीत तीस टक्के वाढ डीपीसी च्या माध्यमातून करोना निर्मूलनासाठी साडेचार हजार कोटीचा खर्च, आमदार निधीची दोन कोटीवरून चार कोटी पर्यंत वाढविलेली मर्यादा, अतिवृष्टी व आपत्तीग्रस्तांना तब्बल 11%52 कोटीची मदत, आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी तब्बल पाच हजार कोटीच्या निधीची उभारणी, पोलिसांच्या फोर्स वनसाठी अत्याधुनिक शस्त्र खरेदी तर राज्यात 529% पोलीस कर्मचार्यांची भरती शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे सुमारे सत्तर टक्के झालेले काम इ महत्वाचे निर्णय घेतले सातारा जिल्ह्यात जंबो हॉस्पिटल व सीसीसीची उभारणी हे निर्णय महत्वपूर्ण होते. राज्यशासनाकडून गेल्या दोन वर्षात जास्तीत जास्त निधी सातार्‍या साठी उपलब्ध करून देण्यात आला. आत्तापर्यंत कोविड निर्मूलनासाठी 112.5 कोटी रुपये खर्च झाला. कोविडमुळे दोन्ही पालक गमाविलेल्या 14 बालकांना पाच लाखाची मदत तर शेतकर्‍यांना 3% 0 कोटीची कर्जमाफी देण्यात आली. सातारा जिल्ह्यात पहिला डोस 85%नागरिकांनी तर दुसरा डेस 3%% नागरिकांनी घेतला आहे. गेल्या दोन वर्षात जे जनहिताचे निर्णय झाले त्याची माहिती जन सामान्यांपर्यंत पोहचविण्याची मोहिम शिवसेनेने हाती घेतली असून त्यांच्या सूचना जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसैनिकांना देण्यात आल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
जगभरात दहशतीचे वातावरण तयार केलेल्या ओमी क्रोम विषाणूच्या सतर्कतेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना शंभूराज म्हणाले राज्यातील विमानतळ प्राधिकरणां ना विशेषत्वाने सतर्क करण्यात आले असून आरटीपीसीआर टेस्ट विलगीकरण आणि चाचणी संख्या इ सूचना देण्यात आल्या आहेत. टास्क फोर्स यंत्रणा सतर्क असून प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. सातारा जिल्ह्यातही नागरिकांनी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजना या संदर्भाने जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व सर्व यंत्रणांची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समन्वयाने तातडीची बैठक घेतली जाणार असून साथनियंत्रणाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी धर्म पाळला जाणार का ? या प्रश्नांवर शिवसेनेने शंभर टक्के आघाडी धर्म पाळला आहे. मात्र राष्ट्रवादी कडूनच या आघाडीचे सोयीस्करपणे पाळणे झाले मात्र जे राजकारण झाले त्याची कल्पना आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊन येथील स्थानिक समीकरणे काय आहेत हे सुद्धा निदर्शनास आणले आहेत. याच संदर्भाने कोरेगाव मतदारसंघात आघाडी धर्म असणार का ? या प्रश्नाला आमदार महेश शिंदे यांनी स्पष्टपणे खोडून काढले. कोरेगावात आघाडी धर्माचा दुरान्वये संबंध असणार नाही, कोरेगावमध्ये जिल्हा बँकेवर निवडून आलेले उमेदवार हे शिवसेनेचे आहेत. कोरेगाव व माणं येथील संचालक शिवसेनेचे असून राष्ट्रवादीने नाकारले तरी सेनेने आपली ताकत दाखविली आहे. जर राष्ट्रवादीने जर राजकीय समीकरणांमध्ये आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हाला सुद्धा सगळे पर्याय खुले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा शिवसेना पूर्ण ताकतीने स्वबळावरच लढणार. शिंदे शिंदे भावकीच्या संदर्भाचा प्रश्नही महेश शिंदे नाकारत म्हणाले कुठं आमच्याशी भावकी जोडताय ते जावलीचे आम्ही खटावचे त्यांचा आमचा काही संबंध नाही, गावात एखादा फिरस्ता येऊन राहतो मग अनेक वर्ष उलटल्यावर ते गाव मग त्यांचचं आहे अस काहीजणांना वाटायला लागतं, कोरेगावात काहींच असचं झालंय, अशी राजकीय कोपरखळी मारायला महेश शिंदे विसरले नाहीत.
महाविकास आघाडी ने गेल्या दोन वर्षात सामान्यांना पिळवटायचे काम केले असा आरोप भाजप नेत्यांनी केला होताए या प्रश्नांवर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, भाजपच्या नेत्यांची ही बडबड वैफल्यग्रस्ततेतून सुरु झाली आहे. सरकार पाडायचे स्वप्न ते गेल्या दोन वर्षा पासून बघत आहेत मात्र त्यांना यश येत नाही. त्यांच्या या अर्थहीन बडबडीकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचे विकासाचे काम अखंड सुरु असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER