Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

म. फुलेंच्या शिल्पसृष्टीबाबत उदासिनता का ? : अरुण जावळे

टीम : धैर्य टाईम्स
Why bother with Mahatma Phule sculpting? : Arun Jawale
छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे व सर्वप्रथम शिवरायांची जयंती साजरी करणारे समाजक्रांतिकारक जोतीराव फुले यांची कटगुण ही कुलभूमी आहे. त्यांच्या पत्नी अर्थात भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचे यांचे नायगांव ही जन्मभूमीही याच जिल्ह्यात आहे. सातारच्यादृष्टीने या दोन्ही गोष्टी अभिमानास्पद व गौरवपूर्ण अशाच आहेत.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे व सर्वप्रथम शिवरायांची जयंती साजरी करणारे समाजक्रांतिकारक जोतीराव फुले यांची कटगुण ही कुलभूमी आहे. त्यांच्या पत्नी अर्थात भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचे यांचे नायगांव ही जन्मभूमीही याच जिल्ह्यात आहे. सातारच्यादृष्टीने या दोन्ही गोष्टी अभिमानास्पद व गौरवपूर्ण अशाच आहेत. यापूर्वी नायगांव येथे शिल्पसृष्टी साकारुन सावित्रीमाईंच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्याचे काम शासनाने केले. परतु, जोतीराव फुले यांच्या कटगुण या कुलभूमीत मात्र शिल्पसृष्टी अद्यापही साकारली नाही. ७ ते ८ वर्षापूर्वी कटगुणच्या शिल्पसृष्टीबाबत प्रशासन स्तरावर चर्चा झाली, तथापि या चर्चेला मूर्तरुप आले नाही. खरंतर, ही बाब खेदजनक आहे. ज्या फुले दांम्पत्याचा वारसा हा सातारा जिल्हा मोठ्या अभिमानाने महाराष्ट्रभर सांगतो, त्या जिल्ह्यातील चक्क जोतीरावांच्या कुलभूमीत शिल्पसृष्टी होत नाही, हा एका अर्थाने जोतीरावांचा घोर अवमान आहे आणि तो आपण सहनही करतोय. त्यामुळे आतापर्यंत झाले हे खूप झाले. यापुढे जिल्हा प्रशासनाने शिल्पसृष्टीबाबत उदासिनता न दाखवता ठोस पावले उचलून दोन कोटींची तरतूद करावी आणि ती उभारावी, असा आग्रह अरुण जावळे यांनी शासनाकडे धरला आहे. यासंबधी जिल्हाधिकारी यांना जावळे यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात अरुण जावळे यांनी असे नमूद केले आहे की, जोतीराव फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलगामी समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्यप्रवर्तक होत. कर्जबाजारपणापायी हैराण झालेल्या शेतक-यांची गा-हाणे फुले यांनी वेशीवर टांगली. समाजातील अगदी शेवटच्या तळाच्या थरातील  माणसांच्या दुःखाशी समरस होऊन सामाजिक न्यायाच्या आणि समतेच्या त्यांनी चळवळी केल्या. न्याय आणि समता यावर आधारलेली समाजरचना अस्तित्वात आणण्याचा ध्येयवाद फुले दांम्पत्याने अंगीकारला व जपला. इतकेच नव्हेतर त्यासाठी ते अखेरपर्यंत झटले. १८४८ ला मुलींची पहिली शाळा सुरू करून जोतीरावांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. स्त्री ही एक समाजाचा स्वतंत्र घटक आहे असून तीला प्रतिष्ठा आहे. मानवी नैसर्गिक हक्क - अधिकार तीला मिळाले पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला. १८६९ ला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवरायांचे कार्यकर्तृत्व त्यांनी जगापुढे आणले. याशिवाय  सतीची चाल, बालविवाह, केशवपन अशा अनिष्ट रुढी - परंपरा विरोधात प्रखर बंड छेडले. या एकूण लढ्यात स्वतः सावित्रीमाई फुले सावलीसारख्या जोतीरावांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या, त्यामुळे तर फुले दांम्पत्याचे 'क्रांतिकारकत्व' समग्र समाज परिवर्तनाच्या चळवळीला विशिष्ट आयाम देणारे ठरले. सामाजिक उत्थानाच्या  कार्यामुळे फुले दांम्पत्याचा आदर केवळ महाराष्ट्रच करत नाही, तर देशभर केला जातो. सातारा जिल्हाप्रशासनानेही कुलभूमीत  शिल्पसृष्टी साकारुन फूलेंचा आदर करावा.
अडीच - तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी जोतीराव फुले यांना भारतरत्न बहुमान मिळावा यासाठी केंद्र सरकारजवळ आग्रह धरला होता.मुख्यमंत्र्यांचा हा आग्रह स्वागतार्ह असला तरी फुले यांना अद्याप भारतरत्न दिला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक भारतरत्न मिळण्याबरोबरच कूलभूमीत जोतीरावांची शिल्पसृष्टी साकारावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी, यासंबंधी पत्रव्यवहारही यापूर्वी झाला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री ना. रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले यांच्याशी सविस्तर  चर्चाही केलेली आहे. रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिल्पसृष्टीबाबत त्यांच्याजवळही आग्रह धरला होता. अलिकडेच विद्यमान पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनाही निवेदन दिले आहे. मात्र आद्याप ठोस हालचाल झालेली दिसत नाही. खरतंर, जिल्हाप्रशासनाने शिल्पसृष्टीचा प्रस्ताव तयार करुन मंत्रालयाकडे एव्हाना पाठवायला हवा होता. मात्र  शिल्पसृष्टीचा विषयच चर्चेत आणायचा नाही असे धोरण राबवून जिल्हाप्रशासन शिल्पसृष्टीला बगल देत असल्याची शंका येऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शिल्पसृष्टीचा प्रश्न पुढे येत नसल्यामुळे मंत्रालयस्तरावर शिल्पसृष्टीला कसलाही वेग येत नाही. इच्छाशक्तीचा अभाव आणि शिल्पसृष्टीबाबत कमालीची उदासिनता जिल्हाप्रशासनाची दिसून येत आहे. आता यापुढे मात्र जिल्हाप्रशासनाने शिल्पसृष्टीबाबत उदासिनतेची व वेळकाढूपणाची भूमिका घेऊ नये. शिल्पसृष्टीचे प्रारुप लवकरात लवकर मंत्रालयाकडे सादर करुन शिल्पसृष्टी असित्वात आणण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा जिल्ह्यातील फुलेवादी विचारप्रवर्तकांडून  सत्याग्रहाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा अरुण जावळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाप्रशासनाला दिला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER