उंब्रज, ता. कराड येथे पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज येथे दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी 31 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
कराड : उंब्रज, ता. कराड येथे पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज येथे दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी 31 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पवन पाडुरंग अंबुरे (वय 24, रा. नरेंद्र- हुबळी, कर्नाटक) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर विनायक देवाप्पा कमडोली (वय 24, रा. इंगळहल्ली, कर्नाटक) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उंब्रज गावच्या हद्दीत असलेल्या तारळीपूलाजवळ पुण्याहून कर्नाटकच्या बाजूकडे निघालेल्या दुचाकी पल्सर (एमएच 14 जेक्यू 2750) व बोलरो (एमएच 10 एएन 6080) यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी पल्सरचे मोठे नुकसान झाले असून चालक पवन अंबुरे याचा मृत्यू झाला आहे. तर विनायक कमडोली हा जखमी झाला आहे. त्याच्यावर उंब्रज येथील शारदा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. तसेच काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटनेचा अधिक तपास पोलीस ए.आर.जमादार करत आहेत.