Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी

गणपत पाटील : शापित भूमिकेचे सोने करणारे दिग्गज कलावंत

टीम : धैर्य टाईम्स

चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा-पायजमा अशा एकाच ढगळ्या वेशात वावरलेले, आपल्या ‘शापित’ भूमिकेचे ‘सोने’ करणारे दिग्गज कलावंत म्हणजेच अभिनयसम्राट गणपत पाटील.

‘दूरदर्शन’वर एका कलाकाराची मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली. त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन् मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते. त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अन् अश्रूंचा बांध फुटला. इतकेच त्या घटनेचे महत्त्व नव्हते, तर अभिनयाची तपस्या व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली अन् एका कलाकाराची जिंदगी कशी उद्धवस्त होत गेली, याचे ते टोकदार उदाहरण होते. ती घटनाच तशी होती. मुलाखतीत ते रडत होते. त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर ते बोलत होते. “या माणसाला मुलगी कशी काय असू शकते? शक्यच नाही! आमच्या अकलेचे दिवाळे निघालेय का, जे आम्ही यांची मुलगी करू? यांच्या घरचीच तिकडून काही तरी भानगड असणार! आम्हाला काय माहिती नाही का मुलीचे वडील ‘हे’ आहेत म्हणून! यांना चालत असेल, पण समाजात आम्हाला तोंड दाखवायचे आहे! आम्हाला नाव आहे, अब्रू आहे, पत आहे अन् यांच्यातच जगायचे आहे. आमचे काय यांच्यासारखे ‘टाळी’ वाजवून थोडेच भागणार आहे का? लोक असंच काहीबाही बोलत राहायचे आणि लोकांच्या या प्रत्येक टोमण्यामागे माझ्या पत्नीचा भावनांचा बांध तुटत होता. ती कोलमडून गेली होती. मुलांच्या लग्नाच्या वेळेस देखील हाच अनुभव आला होता. समाजाने फार वाईट वागणूक दिली. माझ्या अभिनयाची शिक्षा बायको आणि पोरांना भोगावी लागली. ते सगळीकडे चेष्टेचा विषय झाले होते.” इतके बोलून ते कलावंत पुन्हा धाय मोकलून रडू लागले. ‘आत्ता गं बया!’ हे इतकेच शब्द या कलाकाराची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत. तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात ‘नाच्या’चे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण, या मनस्वी कलाकाराच्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो ‘नाच्या’ त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला. बोलणं, दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला. ‘झाले बहू, होतिलही बहू, परंतु या सम हा!’ फक्त आणि फक्त एकच तो कलावंत म्हणजेच ‘अभिनयसम्राट गणपत पाटील.’

गणपत पाटलांचा जन्म २० ऑगस्ट १९२० कोल्हापुरात एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरिता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्याकाळी चालणार्‍या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बर्‍याचदा सीतेची भूमिका वठवली. दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या ‘शालिनी सिनेटोन’मध्ये ‘प्रफुल्ल पिक्चर्स’मार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहाय्यकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले. त्या सुमारास पाटलांना राजा परांजपे यांच्या ‘बलिदान’ व राम गबाल्यांच्या ‘वंदे मातरम्’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय कारकिर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ‘मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.

 

चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ‘ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची म्हणजेच ‘नाच्या’ची आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी ‘सोंगाड्या’चीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या ‘नाच्या’च्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन, कृष्णा पाटलांनी ‘वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे ‘नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील’ हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले. बायकी किरट्या आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून अन् डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे अन् अगदी ठसक्यात खुमासदार पद्धतीने तो ‘नाच्या’ साकारायचे. खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे अन् ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसायची. प्रेक्षकदेखील त्यांना मनापासून दाद द्यायचे. जयश्री गडकर, लीला गांधी, सीमा ते उषा नाईक, उषा चव्हाणांपर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले, तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता, तो म्हणजे गणपत पाटील.

 

गणपत पाटलांनी साकारलेला कोणताही सिनेमा घ्या, त्यात त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी आठ ते नऊ मिनिटांची आहे. ‘बालध्रुव’मध्ये ते बालकलाकार म्हणून चक्क मॉबमध्ये उभे होते. १९४९ मधल्या ‘मीठभाकर’ने त्यांना ओळख दिली. ‘राम राम पाव्हणं’ने शिक्का मारला, तर १९५१च्या ‘पाटलाचा पोर’ने त्यांची चौकट पक्की केली. त्याच वर्षी आलेल्या ‘छत्रपती शिवाजी’मध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या होत्या. १९६० ‘शिकलेली बायको’ने त्यांचे बस्तान पक्के केले. १९६३ मधील ‘थोरातांची कमळा’ने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या १९६४ मधल्या ‘पाठलाग’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वाघ्या मुरळी’ या सिनेमांनी त्यांचे आयुष्य बदलले. इथेच घात झाला! खरे ‘गणपत पाटील’लोप पावले आणि ‘नाच्या गणपत पाटील’ लोकमानसाच्या नसानसांत भिनला. १९६५ मध्ये आलेल्या ‘केला इशारा जाता जाता’ने त्यांना स्टार कलाकारांइतके महत्त्व आले. १९६५च्या ‘मल्हारी मार्तंड’ आणि ‘रायगडचा राजबंदी’ने मराठी तमाशापटांत गणपत पाटलांचे स्थान अबाधित केले. ‘बाई मी भोळी’ आणि ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ आणि ‘सांगू मी कशी’, ‘सुरंगा म्हनत्यात मला’, ‘छंद प्रीतिचा’, ‘धन्य ते संताजी धनाजी’पर्यंत सारे ठीक चालले होते. मात्र, १९६८च्या ‘एक गाव बारा भानगडी’ने गणपत पाटील थोडेसे सावध झाले. कारण, या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला ‘तमाशा’ होऊ लागलाय, हे पाटलांच्या ध्यानी येऊ लागले. १९६९ मधील ‘खंडोबाची आण’ व ‘गणगौळण’मध्ये त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण, १९७०च्या ‘अशी रंगली रात’ आणि ‘गणानं घुंगरू हरवलं’ या सिनेमात त्यांच्या वाटेला मोठे ‘फुटेज’ आले. १९७१च्या ‘अशीच एक रात्र’ आणि ‘लाखात अशी देखणी’ने पुन्हा गाडी रुळावरून ढासळू लागली. मात्र, १९७१ मध्ये दादांच्या ‘सोंगाड्या’ने त्यांना नाव दिले अन् समाजाने त्यांचे नाव घालवले. यानंतर आलेल्या अनेक सिनेमांत ‘पुढारी’, ‘सून माझी सावित्री’, ‘सुगंधी कट्टा’, ‘जवळ ये लाजू नको’, ‘कलावंतीण’, ‘नेताजी पालकर’, ‘ग्यानबाची मेख’, ‘हळदी कुंकू’, ‘मंत्र्याची सून’, ‘सवत’, ‘पोरी जरा जपून’, ‘तमासगीर’ , ‘दोन बायका फजिती ऐका’, ‘राखणदार’, ‘बोला दाजिबा’, ‘इरसाल कार्टी’, ‘थांब थांब जाऊ नको लांब’, ‘लावण्यवती’, मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे’ हे चित्रपट मुख्यत्वे गाजले.

 

गणपत पाटील जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांच्याशिवाय तमाशापट अशक्य झाला होता. विशेष बाब म्हणजे, तमाशाच्या फडावर नाचणारी कलावंतीण जयश्री गडकर, लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण, उषा नाईक, रंजना, मधु कांबीकरपासून ते माया जाधव यांच्यापर्यंत कोणीही ‘लीड रोल’मध्ये असले, तरी ‘‘नाच्याचे काम गणपत पाटलांना द्या,” असा त्या अभिनेत्रींचा आणि दिग्दर्शकाचा आग्रह असे. ते तिकडे रमत गेले अन् इकडे त्यांचा संसार जगाच्या टवाळीचा विषय झाला. त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतले असेल, याची कल्पनाही करवत नाही. इतके असूनही पाटलांनी आपल्या चेहर्‍याला रंग लावून घेणे बंद केले नाही. गणपत पाटलांनी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत की कुणापुढे कशाची याचना केली नाही. सगळे दुःख, अपमान, व्यथा, तिटकारा ते सोशित गेले. मात्र, अंती त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा, पायजमा अशा एकाच ढगळ्या वेशात वावरलेला हा माणूस आपल्या ‘शापित’ भूमिकेचे ‘सोने’ करून गेला. पण, त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘रंग नटेश्वराचे’ पुस्तकामध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय, म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या ‘नटरंग’ चित्रपटाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. २०१३ सालचा ‘विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ त्यांना मरणोत्तर जाहीर झाला होता. तत्पूर्वी २००५चा ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ हाच काय तो त्यांचा कौतुक सोहळा!

 

त्यांच्या ‘आत्ता गं बया’ला दाद दिली नसेल, असा मराठी रसिक विरळाच! अंगात मखमली बदाम अन् त्यावर हाफ जाकीट, गळ्यात गुंडाळलेला रंगी बेरंगी रुमाल अन् डोक्यावर बुट्टेदार टोपी, अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या ‘नाचा’च्या भूमिकेत समरसून जायचे. या भूमिकेने त्यांना मानही दिला अन् प्रचंड अपमान देखील! आपल्या भूमिकेचे त्यांनी सोने केले, पण त्या भूमिकेनेच त्यांच्या आयुष्याची माती केली. पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीयपंथीयांसाठीची संज्ञा झाली. अगदी ‘नटरंग’ सिनेमा येईपर्यंत, ही अवस्था होती. ‘नटरंग’ सिनेमा जानेवारी २०१० मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याआधीच म्हणजे, २३ मार्च २००८ रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला गेला. ‘नटरंग’ आला अन् मराठी सिनेमाचे व गणपत पाटलांचे पांग फेडून गेला. त्यांच्या भूमिकेचे त्यांनी सोने केले, पण त्या भूमिकेने नेहमीच त्यांच्या आयुष्यावर मात केली. अशा सर्वगुणसंपन्न, गुणी पण अभागी अभिनेत्यास मनापासून सलाम!

- आशिष निनगुरकर

(साभार - फेसबुक पेज वरून )

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER