फलटण येथील आयुर उद्योगसमूहाचे अध्यक्ष दिगंबर आगवणे हे सध्या एका गुन्ह्यासंदर्भात लोणंद (ता. खंडाळा जि. सातारा ) येथील पोलिस कस्टडी मध्ये आहेत.
आज सकाळी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर लोणंद येथील एका खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.
दिगंबर आगवणे यांच्या मोबाईल व्हाट्सअप स्टेटस ने व अनेक व्हाट्सअप ग्रुप वरील मेसेजने सध्या खळबळ उडाली आहे. यांचा व्हाट्सअप स्टेटस पुढील प्रमाणे,
मी-तुषार दिगंबर आगवणे
दी:-29/08/2022 रोजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर ,आणि त्यांचे सहकारी व पोलिस यांनी माझ्या वडिलांना खूप त्रास दिला आहे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून माझ्या वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ....आता त्यांची अवस्था खूप critical आहे आमच्या साठी plz सर्वांनी आवाज उठवावा जर माझ्या वडिलांना काय झाले तर सर्वस्व जबाबदार खासदार रणजिसिंह व पोलिस यंत्रणा जबाब राहील
Plz request आहे माझ्या वडिलांना न्याय द्या....