फलटण, दि. 29( प्रतिनिधी)

येथील जोशी हॉस्पिटल प्रा.ली.येथे सांधे- रोपण (Joint Replacement) साठी लागणारे रोबोटिक्स चे तंत्रज्ञान लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहीती डॉ प्रसाद जोशी यांनी दिली.
जोशी हॉस्पिटल प्रा. ली. फलटण येथे गेल्या २३ वर्षांपासून खूबे, गुढघे, खांदे यांचे सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या होत आहेत. आज पर्यंत ४००० हून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया तालुकास्तरीय पातळीवर फलटण येथील जोशी हॉस्पिटल प्रा. ली. येथे डॉ प्रसाद जोशी यांनी केल्या आहेत. भारतात तालुका स्तरीय पातळीवर एकाच हॉस्पिटल मध्ये एकाच सर्जननी सर्वात जास्त सांधेरोपण केल्यामुळे २०१७ साली डॉ. प्रसाद जोशी यांना इंडियन अचिव्हर अवॉर्डने आणि २०१८ साली भारत गौरव अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. २०१९ साली सकाळ ग्रुप नी Excellence in Orthopedics हा किताब डॉ.प्रसाद जोशी यांना बहाल केला आहे.
२०१२ पासून BRAIN LABS या कंपनी चे COMPUTER NAVIGATION हे सांधे रोपणासाठीचे लागणारे उच्च तंत्रज्ञान जोशी हॉस्पिटल प्रा ली, फलटण येथे उपलब्ध आहेच. रोबोटिक्स चे तंत्रज्ञान शिकण्यासाठी डॉ. प्रसाद जोशी यांनी अमेरिकेतील फ्लो्रीडा येथील सर्वात मोठ्या रोबोटिक्स लॅब मध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले आहे.
भारतातून त्यासाठी फक्त ७ डॉक्टरांमधून डॉ. प्रसाद जोशी यांची त्यासाठी निवड झाली होती. रोबोटिक्सचे तंत्रज्ञान हे सध्या फक्त मोठ्या शहरात काही ठिकाणीच उपलब्ध असून तालुका स्तरीय हे भारतातील पहिलेच ठिकाण असेल असे डॉ जोशी यांनी नमूद केले आहे.
सध्या जोशी हॉस्पिटल प्रा. ली. येथे संधेरोपणासाठी सातारा, पुणे, मुंबई, नागपूर, लातूर,नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, सोलापूर, रत्नागिरी, लांजा,गोवा, बांदा, बंगळूर, काशी, गया, अमेरिका आणि सौदी अरेबिया हून येत आहेत.
जोशी हॉस्पिटल प्रा ली संचलित, फलटण रोबोटिक्स सेंटर असे याचे नाव ठेवण्यात येणार असून फलटण तालुक्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण असून फलटण आणि सातारा जिल्ह्यात एक मानाचा तुरा खोवला जाईल यात काही शंकाच नाही. या अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांनाच होईल यात काही शंकाच नाही तसेच अदयावत टेक्नॉलॉजी वापरणारा सर्जन आणि त्याचे कौशल्य हे ही फार महत्त्वाचे आहे असे डॉ प्रसाद जोशी यांनी प्रतिपादन केले.












