फलटण प्रतिनीधी:-फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज 2 आक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गजानन चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) कार्याध्यक्ष, आमिर भाई शेख, फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार,फलटण शहर युवकचे अध्यक्ष प्रीतम जगदाळे, तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन बागवान,फलटण तालुका ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दीपक शिंदे,ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष विकास ननवरे, खजिनदार बालमुकुंद भट्टड, कार्यकारिणी सदस्य मनोहर गायकवाड मंजेखान मेटकरी, हनुमंत महामुनी इ. मान्यवर उपस्थित होते.











