Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटण येथील लोकमान्य पतसंस्थेतील कर्जदार व ठेवीधारकांचा लवकरच मेळावा

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : फलटण येथील लोकमान्य पतसंस्था कर्जदार व ठेवीदार यांच्या मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. यावेळी कायदेतज्ञ, विधीतज्ञ, माजी सहकार विभागातील अधिकारी, विविध सामाजिक संघटना पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर कर्जदार व ठेवीदारांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.मेळाव्यासाठी सर्व कर्जदार व ठेवीदारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

 फलटण येथील लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांचे मुदत पूर्ण झाल्यानंतरही आणि काहींची मुदत पूर्व मागणी असतानाही ठेवीच्या रकमा परत केल्या नाहीत याप्रकरणी पोलीस ठाण्यात संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी तसेच जिल्हा ग्राहक न्यायमंचाकडे फिर्याद दाखल करण्याची मागणी होत आहे.

लोकमान्य पतसंस्था ठेव गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली असून पतसंस्थेच्या कर्ज वसुली व ठेवी वाटप मध्ये अफरातफर व अनियमितता झाल्याची तक्रार काही कर्जदार व ठेवीदार यांनी केली आहे. त्यामुळे संचालक, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. आर्थिक गुन्हे विभागातर्फे तपासणी करण्याची मागणी होत आहे. कर्जदार व ठेवीदारांचे जवाब नोंदविण्यात यावेत. शासनाकडून लेखा परिक्षण तपासणी करण्याची आवश्यकता असून क्षमतेपेक्षा जास्त कर्ज वाटप केल्यामुळे व कर्जाची वसुली झालेली नसल्यामुळे संस्था अडचणीत आली आहे असा सर्वसाधारण सूर आहे. 

थकीत कर्जदार यांच्याकडून बेकायदेशीर व नियमबाह्यपद्धतीने कर्ज वसुली सुरू असून ठेवीदार ज्येष्ठता यादीनुसार कर्ज वसुली नुसार ठेव वाटप होत नसून लोकमान्य संस्था बेकायदेशीर कर्ज वसुली व ठेव वाटप प्रकरणी जबाबदार व्यक्तींचे विरोधात गुन्हे दाखल करण्याची आपल्या आवश्यकता असल्याचे कर्जदार व ठेवीदार यांनी सांगितले आहे. अनेक थकीत कर्ज वसुली या बेकायदेशीर तडजोडी झाल्या असल्याचा आरोप होत आहे याबाबत सहकार आयुक्त यांनी चौकशी करावी. आजअखेर किती थकीत कर्ज वसुली झाली त्याचे वाटप ठेवीदार यांनी नियमाप्रमाणे झाले का असा सवाल विचारला जात आहे.

नियमबाह्य कर्ज वसुली व वसुली झालेल्या रकमेतून नियमबाह्य ठेवी वाटप होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. आजअखेर गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे वेळोवेळी आश्वासन दिले होते. आजअखेर ठेवीदारांनी त्यांना भरपूर अवधी संस्थेस दिला आहे. परंतु त्या काळात गुंतवणूकदारांचे पैसे पतसंस्था परत करू शकली नाही. एकंदरितच या सर्व पार्श्वभूमीवर आता गुंतवणूकदारांना आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवावयाची आहे. कर्जदार व ठेवीदार यांनी एकत्रित एका मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. मेळाव्यास अनेक कायदे तज्ञ, विधीतज्ञ, माजी सहकार विभागातील अधिकारी, विविध सामाजिक संघटना पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात काय होईल याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER