Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनिानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले ध्वजवंदन - सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 1 :  सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, कास पठार असे विविध ठिकाणे आहेत जे पर्यटकांना आकर्षीत करीत आहेत. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातून सातारा जिल्हा पर्यटन हब करुन जिल्ह्याला आर्थिक चालना देणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
महाराष्ट्र स्थापना दिनिानिमित्त पालकमंत्री श्री. देसाई यांनी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाात ध्वजवंदन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे,  जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी,  कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले सर्वच क्षेत्रातील एक उज्वल परंपरा असणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे अभिमानाने नाव घेतले जाते. राज्याच्या जडण घडणीत महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे स्व. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.  परकीय गुंतवणूकीसाठी उद्योजकांचे पसंती असणारे  महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य   आहे.   मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,   उपमुख्यमंत्री अजित   पवार   यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर नेहण्याचा प्रयत्न त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून आम्ही करीत आहोत.  
पुर्वीच्या काळी जिल्ह्यातील नागरिक कामासाठी, पुणे, मुंबई येथे जात होते. परंतु सातारा जिल्ह्यात कृषी, आद्योगिक क्रांतीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल आहेत.  कोयना धरण बांधले या धरणाच्या 67 टक्के पाण्यावर 2 हजार मेगा वॅट  वीज निर्मिती सुरु करुन सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला वीज दिली.  कोयने काठच्या शेतकऱ्यांना एकही रुपयान न घेता पाणी देण्याचा निर्णय महसूल विभागच्या माध्यमातून स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी घेतला. औद्योगीक प्रगतीच्याबाबतीत  सातारा जिल्हा नेहमीच एक पाऊल पुढे राहिला आहे. तसेच सातारा जिल्हा हा डोंगरी जिल्हा आहे. या डोंगरी भागात शेती सिंचनासाठी साठवण हौद आणि वळण बंधाऱ्यांची काम येत्या काळात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचेही  पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे मरळी येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच या महोत्सवात बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालांचे स्टॉलही उभारण्यात आले होते. महोत्सव कालावधीत 25 लाखांची विक्री झाली आहे. 11 हजाराहून अधिक लोकांनी या महोत्सवाच्या अनुषंगाने जल पर्यटनाचा लाभ घेतला. देशात पर्यटन वाढीस चालना देऊन परदेशी पर्यटकांना आकर्षीत करुन पर्यटन क्षेत्रामध्ये उलाढाल वाढविण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. त्या प्रयत्नातूनच कश्मिर खोरे पुर्वपदावर येत होते. पण दशतवाद्यांनी भ्याड हल्ला करुन या प्रयत्नांमध्ये अडखळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश म्हणून आपण सडेतोड उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.
  महाबळेश्वर येथे 2 ते 4 मे कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वर याचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांची सुरक्षा करणे हे पर्यटन विभागाचे काम आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन दलाची स्थापना प्रायोगीक तत्वावर करण्यात आली आहे.  या पहिल्या तुकडीचे कामकाजाचा प्रारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात यामध्ये माजी सैनिकांचाही सहभाग घेणार आहे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
 
 यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा स्थापनेची औचारिक घोषणा केली. यानंतर त्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, विशेष ग्रामपंचायतींचा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार व पोलीस दलामध्ये विविध प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्माचिन्ह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते देण्यात आले.
ध्वजारोहणापुर्वी पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोवई नाक्यावरील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासपुष्पहार व शाहू स्टेडीयम समोरील शहिद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानात जावून पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER