पिंपरद (फलटण ) येथे ग्रामपंचायत निवडणूक सन 2022 च्या अनुषंगाने आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. दुपार 2 पर्यंत 55 % पेक्षा जास्त मतदान झाले आहे.
सिद्धेश्वर वार्ड 819 पैकी 416, हनुमान वॉर्ड 802 पैकी 550,लक्ष्मी वॉर्ड 513 पैकी 342, तर बिरोबा वॉर्ड 710 पैकी 399 मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
पिंपरद येथील ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजे गट सिद्धेश्वर पॅनेल विरोधत भाजपा पुरस्कृत खासदार गट मारिमाता ग्रामविकास पॅनेल अशी होत आहे. तर थेट सरपंच पदाच्या निवडीसाठी दोन अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. मतदानास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसत होते.