केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत
साताऱ्यातील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.
सुदैवाने रामदास आठवले सुखरुप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.











