मा. खासदार कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे फलटच्या विकासाचे स्वप्न त्यांचे चिरंजीव मा. खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर हे दोन्हीही बंधू पूर्ण करतील असा विश्वास आता फलटणकरांना वाटू लागला आहे.
सत्ता आल्यानंतर मानपान, मोठेपणा, दिखावा त्यांचबरोबर प्रसिद्धीसाठी अनेक जण हपापलेले आपण पाहतो, मात्र या सर्वांपासून दूर राहत जनता हेच माझे दैवत मानणारे व त्यांच्या बरोबर त्यांच्या खांद्यावर हात ठेवणारे नेते म्हणजे फलटण नगर परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर होय. आज त्याचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा...
मा. खासदार कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून स्वतःला घडवत स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. करारीबाणा, रोखठोक निर्णय, कार्यकर्त्यांना जपण्याची वेगळी हातोटी, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकत हे हिंदुराव यांच्यातील गुण आदरणीय समशेरदादा यांच्यामध्ये दिसतात. अगदी कमी वयामध्येच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील बाळकडू दादांना मिळाले. बलाढ्य राजकीय ताकत विरोधी असतानाही स्वतःच्या हिमतीवर स्वतंत्र गट निर्माण कसा करायचा हे समशेरदादांनी दाखवून दिले.
राजकीय यशामध्ये माझ्या कार्यकर्त्यांचा सगळ्यात मोठा वाटा असल्याचे मनाचा मोठेपणा फक्त समशेरदादाच दाखवू शकतात. खरे तर फलटण मधील तरुणांमध्ये त्यांची वेगळीच क्रेज आहे हे अनेक वेळा दिसते. राजकीय डावपेच आखण्यात अत्यंत चतुर राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. फलटण शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट दादांकडे आहेच. शहराच्या अनेक प्रश्नांवर धाडसी निर्णय घेण्याची क्षमता दादांकडे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच. समशेरदादांचा फलटण शहराबरोबर तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी मोठया खुबीने हाताळली होती. त्यांचा lजनसंपर्क व प्रचाराची आघाडी सर्वांनीच पहिली आहे.
मा. खासदार कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे फलटच्या विकासाचे स्वप्न त्यांचे चिरंजीव मा. खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर हे दोन्हीही बंधू पूर्ण करतील असा विश्वास आता फलटणकरांना वाटू लागला आहे. त्यामुळे येणारा काळात या दोन्ही सिंहाकडे मोठी राजकीय ताकत निर्माण होवो व त्यांच्या हातून समाजाची, देशाची सेवा घडो हिच आई भवानी चरणी प्रार्थना.
टिम - धैर्य टाईम्स