फलटण :
फलटण तालुका वारकरी संघटनेच्या वतीने लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण येथे वारकऱ्यांचे सेवेत दहा हजार शेव चिवडा पाकीट वाटप करण्यात आले. तसेच मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वतीने वारकऱ्यांना मोफत चहा व बिस्कीट चे वाटप, अभिनव महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळचे वतीने वारकऱ्यांना पोहे व पाणी बोटल वाटप याचा शुभारंभ फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. प्रसन्न जोशी, ह. भ. प. केशवराव जाधव महाराज, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तर फलटण तालुका वारकरी संघटना, लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन व विश्व हिंदू परिषद वैद्यकीय सेवा पथक पश्चिम महाराष्ट्र संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी प्रा. सतीश जंगम , घनवट सर, दशरथ भोसले , दादा भोसले, नाना शिंदे, राजाभाऊ नागटीळे प्रदीप गोडसे, मोहनराव रणवरे, नितिन जगताप, अमोल घाडगे राजाभाऊ निंबाळकर, महेश घाडगे,कैलास गायकवाड किरण वणवे, अक्षय कुचेकर, अक्षय खलाटे, व मंडळाचे पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.