Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

शेतकऱ्यांना दर्जेदार कृषि निविष्ठांचा पुरवठा करा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी यंत्रणांनी काटेकोर दक्षता घ्यावी
टीम : धैर्य टाईम्स

सातारा, दि. 18  : शेतकऱ्यांची बियाणे, खते, व किटकनाशके या कृषि निविष्ठांमध्ये फसवणूक होवून त्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी कृषि विभागाने काटेकोर दक्षता घ्यावी. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही.  गुणवत्ता नियंत्रणामध्ये ज्या बियाणे, खते, आणि किटकनाशकांचे नमुने अप्रामणित आढळून ज्या कंपन्या  कोर्ट केस पात्र ठरल्या आहेत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी. कृषि निविष्ठा पुरवठादारांनी जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा पुरवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. यावेळी त्यांनी भरारी पथकांकडून  काटेकोर तपासणी होणे आवश्यक असल्याचे सांगून तालुकास्तरावरील पथकांकडून करण्यात आलेल्या तपासणीतील 10 टक्के प्रकरणांची जिल्हास्तरावरील भरारी पथकाने फेर तपासणी करावी, असे निर्देश यंत्रणांना दिले.

 जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद विजय माईनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, पोलीस उप अधिक्षक के.एन. पाटील, मोहीम अधिकारी दत्तात्रय येळे, गुणनियत्रण निरिक्षक  संजय फडतरे, महाबीज चे सुनिल पारधे, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाचे दिलीप झेंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्याला झालेल्या कृषि निविष्ठांची मागणी पुरवठा, गुणवत्ता यांचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यात बियाणे, रासायनिक खते, मागणीच्या प्रमाणात विपुल असल्याचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी सांगितले.

खरीप हंगाम 2023-24 साठी जिल्ह्याला 115.10 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त असून आज अखेर 113.77 मेट्रिक टन खत उपलब्ध झालेले आहे यामध्ये युरिया 38 हजार 899 मे. टन, डीएपी 14 हजार 683 मे. टन म्युरेट ऑॅफ पोटॅश 2 हजार 191 मे. टन सुपर फॉस्पेट 15 हजार 749 मे टन, तर इतर संयुक्त खते 42 हजार 249 मे. टन याप्रमाणे खते कृषि सेवा केंद्रात उपलब्ध आहेत.

 चालू हंगामात जिल्ह्याची एकूण बियांणाची मागणी 47 हजार 331 क्विंटल आहे. आजअखेर  45 हजार 755 क्विंटल पुरवठा झालेला आहे. यामध्ये ज्वारी 1202 क्विंटल, बाजरी 1795 क्विंटल,  भात 11 545 , घेवडा 2489 क्विंटल, मका 9432 क्विंटल, उडिद 337 क्विंटल, मुग 621 क्विंटल, सोयाबीन 15127 क्विंटल, वाटाणा 3186 क्विंटल, बियाणांचा पुरवठा झालेला आहे. 60 टक्के बियाणांची विक्री झाली असून अनेक शेतकऱ्यांकडे स्वत:ची बियाणे आहेत. जिल्ह्यात बियाणांचा मागणीप्रमाणे पुरवठा झालेला आहे. खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचे ग्रेड निहाय नियोजन करण्यात आले आहे.

 जिल्ह्यात बियाणे विक्रीचे 1 हजार 263 रासायनिक खते विक्रीचे 1 हजार 479, तर किटकनाशके विक्रीचे 1 हजार 188 परवाने आहेत त्यांची तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अशा एकूण  36 गुणनियंत्रण निरिक्षकांमार्फत नियमित तपासणी करण्यात येते, असे जिल्हा अधक्षिक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सागितले. तालुका व जिल्हा स्तरावर 12 पथके नेमलेली असून आतापर्यंत तपासणी मध्ये अनियमितता आढळून आलेल्या 14 कृष्षि सेवा केद्रांवर परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. 4 कृषि सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.   

 सर्व खते, बियाणे, किटकनाशके कंपन्यांनी जिल्ह्यात दर्जेदार व उत्तम गुणवत्तेच्या कृषि निविष्ठा पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. तसेच अप्रामणित कमी दर्जाच्या निविष्ठा पुरविणाऱ्या कंपन्यांवर कठोर कार्यवाही चे आदेशही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

तालुकास्तरावरील पथकांकडून करण्यात आलेल्या तपासणीतील 10 टक्के प्रकरणांची जिल्हास्तरावरील भरारी पथकाने फेर तपासणी करावी. -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER