फलटण : प्रतिनिधी
धैर्य टाईम्स या वृत्तपत्राच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २८ मे २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध भागातून आलेल्या गायकांना ऐकण्याची संधी फलटणकरांना आज मिळणार आहे. सदर स्पर्धा फलटण - गिरवी रोड, साई मंदिर हॉल, साई मंदिर, जाधववाडी ता. फलटण या ठिकाणी संपन्न होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार दिपकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेकरीता मुंबई,पुणे,सातारा,बारामती, माळशिरस, नातेपुते,दहिवडी,म्हसवड, इंदापूर, शिरवळ,लोणंद, आदी भागातील स्पर्धक आपले गायन कौशल्य दाखविणार आहेत. या स्पर्धा सर्वांसाठी मोफत पाहण्यासाठी असणार आहेत.
विजेत्या स्पर्धाकांना पुढील प्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिला क्रमांक रुपये ५०००/- पाच हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र,दुसरा क्रमांक रुपये ३०००/- तीन हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र, तिसरा क्रमांक रुपये २०००/- दोन हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ रुपये १०००/- एक हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ रुपये १०००/- एक हजार रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र, अशा पाच विजेत्या स्पर्धाकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेनंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सायंकाळी 5 वाजता बक्षीस वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ असणार आहेत. यावेळी फलटण येथील सुप्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ. प्रसाद जोशी, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील जगताप यांच्या सह विविध मान्यवर उपास्थित राहणार आहेत.











