सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२१ -२०२६ च्या प्रचारार्थ ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी रविवाारी 31 रोजी पार्ले येथे सदिच्छा भेट दिली.
कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२१ -२०२६ च्या प्रचारार्थ ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी रविवाारी 31 रोजी पार्ले येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती तानाजीराव नलवडे, पार्लेचे मा. सरपंच प्रकाश नलवडे, महानंदा दूध डेअरी मुंबईचे संचालक वसंतराव जगदाळे (आबा), कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. कराडचे मा. चेअरमन संपतराव इंगवले (आप्पा), व्हाइस चेअरमन बाबुराव धोकटे, सुदाम चव्हाण कोपर्डेकर, तसेच पार्लेचे दिनकर नलवडे, बाबुराव नलवडे, भगवान पाटील, प्रल्हाद नलवडे, उत्तम पाटील, मोहन नलवडे, महिपती नलवडे, भानुदास नलवडे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीची अर्ज माघारीनंतर खरी रणधुमाळी सुरू होणार असून विविध समीकरणांकडे मतदारांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तसेच आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आत्तापासूनच मतदार, पदाधिकाऱ्यांनी कोपरा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.