Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

सुपने विभागातील शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा द्या

शेतकऱ्यांची मागणी : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट
टीम : धैर्य टाईम्स
Provide daytime power supply for agriculture in Supne division
गत काही महिन्यांपासून सुपने, पश्चिम सुपने, केसे, पाडळी, तसेच तांबवे विभागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तसेच बिबट्याने हल्ले करून अनेक पाळीव प्राणी मारले असून माणसांवरही बिबट्याने जीवघेणे हल्ले केले आहेत.

कराड : गत काही महिन्यांपासून सुपने, पश्चिम सुपने, केसे, पाडळी, तसेच तांबवे विभागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तसेच बिबट्याने हल्ले करून अनेक पाळीव प्राणी मारले असून माणसांवरही बिबट्याने जीवघेणे हल्ले केले आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातानारण निर्माण झाले असून वीज महामंडळाने सुपने विभागातील शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी विभागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सुपने विभागातील शेतकऱ्यांनी गुरुवार दि. २५ रोजी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, तसेच महावितरणच्या मुंढे, सब स्टेशन कार्यकारी अभियंता यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी शिवाजी पाटील, बाबासो पाटील, शशिकांत कोळी, भागवत बडेकर, तुकाराम मोरे, राम गायकवाड, भिकाजी गायकवाड, दत्तात्रय थोरात,  विश्वजित थोरात, भगवान गायकवाड, बाळासाहेब कोळी, दीपक गायकवाड, हणमंत जाधव, तुकाराम जांभळे तसेच शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सुपने, पश्चिम सुपने, केसे, पाडळी, तांबवे विभागात बिबट्याचे वारंवार हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिबट्याने आत्तापर्यत सुपाने व तांबवे विभागात अनेक पाळीव प्राणी प्राण्यांवर हल्ले करून त्यांचा प्राण घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी येणके येथे बिबट्याने ऊसतोड मजुरांच्या ५ वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार मारले होते. त्यामुळे कराड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आता भर दिवसाही शेतात जायला धजावत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यातच महावितरणकडून शेतकऱ्यांना शेती पंपासाठी रात्री १२:३० ते सकाळी ८:३० असा वीजपुरवठा केला जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. बिबट्याच्या भीतीने शेतकरी रात्री शेतात जात नाहीत. तसेच शेतातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील लोकांना तर दिवसाही घराबाहेर पडणे संकटकारक बनले आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम सुपने येथे दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. या सर्व घटनांमुळे विभागातील शेतकऱ्यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या सगळ्याचा महावितरण, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य दाखल घेऊन शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER