Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

महायुतीने माढ्यातील रणजितसिंह यांची उमेदवारी बदलावी : श्रीमंत रामराजे यांचा महायुतीला घरचा आहेर

टीम : धैर्य टाईम्स

फलटण : आगामी लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. माढा लोकसभा मतदार संघात महायुती कडून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर झाली आहे मात्र रणजितसिंह यांची उमेदवारी आपल्याला मान्य नसून महायुतीने रणजितसिंह यांची उमेदवारी बदलावी असे आवाहन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते आमदार रामराजेंनी महायुतीला घरचा आहेर दिला. ते आज फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जाहिर मेळाव्यात बोलत होते.

यावेळी आमदार दिपकराव चव्हाण आमदार, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर चेअरमन, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, संदीप मांढरे, सुनील पोळ, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, महानंदाचे संचालक डी. के. पवार, माजी जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, अजून वेळ गेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी गडबड करू नये माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाजपाने बदलावा यावर आजही आपली भूमिका ठाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण युती धर्म पाळणार असलो तरीही हाच उमेदवार ठेवायचा असेल तर मतदान कमी झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण सांगणार असल्याचे रामराजे म्हणाले. माझे राजकारण हे केवळ पाण्यासाठी होते मात्र आता नको त्या माणसांच्या हातात हा जिल्हा जाऊ नये अशी अपेक्षा यावेळी रामराजे यांनी बोलून दाखवली. 

अनेक गट तट असताना आपण कधी सत्तेचा माज केला नाही ना कधी कोणाला पोलीसचौकी दाखविली मात्र याच्या उलट खासदार रणजीतसिंह यांचे काम सुरु असल्याचे सांगून प्रशासन मात्र यांच्या दारातले नोकर असल्यासारखे यांचेच ऐकत असल्याने हे कुठेतरी थांबले पाहिजे तरच आपल्याला भविष्य असल्याचे रामराजे म्हणाले. तालुक्यात दडपशाही व दहशतीचे काम खासदार रणजितसिंह यांच्याकडून सुरू असून हे त्यांनी ही वागणूक बदलाचा शब्द व सुडाचे राजकारण नकरता कार्यकर्त्यांना लोकशाही प्रमाणे मनमोकळे पणाने काम करायला संधी देऊ असे जाहीरपणे सांगावे अशी अपेक्षा रामराजे यांनी यावेळी केली.

 रणजितसिंह यांना उमेदवारी घोषित होऊन अनेक दिवस झाले तरीही आतापर्यंत आपल्याला फोन आला नसून यांना आमची गरज आहे का नाही हा प्रश्न यावेळी रामराजे यांनी उपस्थित केला. संपूर्ण जिल्हा यांचाच असल्यासारखे बोलणारे बोराटवाडीच्या आमदारांनाच मुख्यमंत्री करू असे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता रामराजे यांनी टोला लगावला. तर महायुतीचा माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलावा यावर आपण ठाम असलो तरीही उमेदवारांनी आपण चूकलो असल्याचे कबूल करावे व आम्हाला विश्वास द्यावा अशी अपेक्षा रामराजे यांनी केली. मी पाण्यासाठी व तुमच्यासाठी स्वतःचा संसार न पाहता गेले 30 वर्षे झिझलो असल्याचे शेवटी रामराजे यांनी म्हटले.

 कार्यक्रमाची प्रास्ताविक  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

या मेळाव्यात अनेकांनी तीव्र शब्दात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह यांच्या उमेदवारीला विरोध केला याचा धागा पकडून रामराजे म्हणाले कार्यकर्त्यांच्या मध्यमातून उफाळून आलेला हा मतप्रवाह आहे.

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असली तरीही माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून संघर्ष थांबायचे नाव घेत नसल्याचे आजच्या मेळाव्या मधून दिसत आहे. 

 

फलटण येथील रामराजे यांनी घेतलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिर मेळाव्यात शरद पवारांच्या तुतारीची मागणी. केल्याने नेते घड्याळात व्यस्त तर कार्यकर्त्यांचा सुर तुतारीचा असा प्रकार निदर्शनास आला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER