फलटण प्रतिनिधी : साखरवाडी भागामध्ये ड्रोन ने निरीक्षण करून चोऱ्या केल्या जात आहेत अशी अफवा आहे. साखरवाडी,जिंती, होळ या परिसरात ड्रोन दिसून आले आहेत हेही खरे आहे मात्र अशा प्रकारे कोणतीही चोरी फलटण ग्रामीण भागात दाखल नसून अफवांवर विश्वास नठेवता खोडसाळपणाने ड्रोन रात्री रिमोटच्या साह्याने आकाशात सोडत आहेत अशा लोकांची गोपनीय माहिती असेल तर फलटण ग्रामीण पोलीसला द्यावी असे आवाहन फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
सध्या लग्न समारंभात ड्रोनची मागणी असल्यामुळे फोटोग्राफर यांच्या कडे व हौशी लोकांकडे ड्रोन आहेत त्यातील काही लोक खोडसाळ पणाने ड्रोन रात्री रिमोट साह्याने आकाशात सोडत आहे अशा लोकांची गोपनीय माहिती असेल तर फलटण ग्रामीण पोलीसला द्यावी. तर एखादे वाहन रात्री आले अफवेमुळे मारहाण करू नये चौकशी करावी व शंका आली तर पोलिसांना कळवा किंवा ११२ ला फोन करा असे महाडिक यांनी म्हटले आहे.
बारामती, दौंड परिसरात पण या प्रकारे ड्रोन दिसून आले आहेत व अफवा पण आहेत याचा छडा लवकर लागेल पण कोणीही घाबरून जाऊ नये. बारामती विमानतळावरून काही शिकावू चार्टर विमान पण रात्री फिरतात त्याबाबत पण माहिती घेत आहोत असे यावेळी महाडिक यांनी म्हटले आहे. तर आपल्या भागात ज्या लोकांकडे ड्रोन आहेत त्याबाबत गोपनीय माहिती द्यावी. पोलीस व महसूल यांच्या परवानगी शिवाय ड्रोन उडवता येत नाहीत.











