Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि 27 :  राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन हा प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शाहू बोर्डिंग सातारा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मार्गावर समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. समता दिंडीचे सुरुवातीस स्वाती इथापे, उपायुक्त, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा अनिल गुजर, पोलीस उपअधीक्षक, दक्षता पथक, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा, शाली जोसेफ, प्राचार्या, समाजकार्य महाविद्यालय, सातारा नितीन उबाळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा व उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन होऊन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर यांनी समता दिंडीस हिरवा ध्वज दाखवून मार्गस्थ केले. या प्रसंगी समता दिंडीमध्ये वरीष्ठ अधिकारी कर्मचारी, शहरातील विविध शाळांमधील सुमारे 200 विद्यार्थी व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व नागरीक सहभागी झाले होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा व सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यामाने स्थुलता जनजागृती आणि उपचार अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे सुरुवातीस सामुहिकरित्या व्यसन मुक्तीची शपथ घेण्यात आली. त्यांनतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच आश्रमशाळेतील शिक्षक व बाहयस्रोत कर्मचारी असे एकूण 78 व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी शिबीरासाठी  डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा. डॉ. प्रितीश राऊत व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. तसेच सदर दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते विविध 35 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन चरीत्र व सामाजिक कार्य या विषयावर प्राध्यापक निरंजन फरांदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री. उबाळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी केले. व्याख्याते यांनी व्याख्यानाच्या विषयाच्या अनुषंगाने बोलताना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य हे सर्वसमावेशक असून या कार्याव्दारे त्यांनी सामाजिक न्याय आणि मानवतेची प्रतिष्ठापना केली असल्याने त्यांचे हे कार्य अनन्यसाधारण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. या व्याख्यानाकरिता प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ए. सी. अत्तार, प्राचार्य, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा यांची उपस्थिती लाभली. तसेच या व्याख्यानाकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER