फलटण प्रतिनिधी :- महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत "आरोग्यवारी अभियान शुभारंभ" या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परीषद सातारा तसेच पंचायत समिती फलटण महिला व बाल विकास विभाग यांच्याकडुन अत्यंत गोपनीय पद्धतीने ठराविक मर्जीतील लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल दिनांक १७ रोजी फलटण महाराजा मंगल कार्यालय येथे एक नियोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याकरीता जिल्हा परीषद सातारा तसेच पंचायत समिती फलटण महिला व बाल विकास विभाग यांच्याकडुन "आरोग्यवारी अभियान शुभारंभ" या कार्यक्रमाचे नियोजन आले होते. परंतू महिला व बाल विकास विभाग विभागाकडून जिल्हा सह तालुक्यात अत्यंत बेजाबदारपणे पद्धतीने काम सुरू असून तालुक्यातील तक्रारी व कामकाज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढे उघडे पडू नये म्हणून अत्यंत पद्धतशीरपणे हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जिल्ह्यातील तथा तालुक्यातील कधीही न झालेली कामे व योजना कशा पार पडल्या हे दाखवण्यात आले तसेच पालखी सोहळा दरम्यान महिलांच्या मूलभूत सोयी सुविधाबाबत "आरोग्यवारी अभियान शुभारंभ" याचे कागदावरच राबवण्यात येणारे नियोजन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या पुढे मांडण्यात आले.
जिल्हा परीषद सातारा तसेच पंचायत समिती फलटण महिला व बाल विकास विभाग हा अनेक वर्षापासून शासकीय योजना फक्त कागदावरच दाखवत आहे. महिला व बाल विकास विभाग चे अनेक अधिकारी विविध योजनेत लाखोंचा मलिदा खात असून फलटण तालुक्यातील अनेक महिला व बालके विविध प्रकारच्या शासकिय योजनांपासून वंचित आहेत. अनेक लाभार्थी हे फक्त कागदावरच असून त्यांना प्रत्यक्षात योजनाचा लाभ मिळत नाही. महिला व बालविकास विभागाकरिता येणाऱ्या विविध शासकीय लाभार्थ्यांपासून लपवल्या जात असून प्रत्यक्ष कागदावरच योजनेची माहिती व लाभ दिल्याचे चित्र रंगवले जात आहे. प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे माहिती संकलित करणे लाभार्थींना योजनांचा लाभ देणे या गोष्टी या फक्त कागदावरच होत आहेत.
महाराष्ट्र शासन दरवर्षी कोट्यावधींचा खर्च हा महिला व बालविकास विभागात विविध योजनांवर करत आहे परंतु अनेक योजनाचा लाभ या गरजू महिला व बालकांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे मिळत नसून योजनेत मिळणाऱ्या किट व वस्तू परस्पर लंपास होत आहेत. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर तालुक्यात अशा योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार वृत्तपत्रांच्या माध्यमातून उघडा पडणार असून अशा योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काल आयोजित कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांना गर्दी जमवण्यासाठी सक्त ताकीद देण्यात आली होती. प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांना या कार्यक्रमापासून लांब ठेवण्यात आले होते फक्त मर्जीतीलच काही लोकांना या कार्यक्रमात बोलवण्यात आले होते. त्यामुळे "आरोग्यवारी अभियान शुभारंभ" हा कार्यक्रम फक्त कागदावरच राहू नये याकरिता महिला व बाल विकास विभाग विभागाकडून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची खास नेमणूक करून सदरचे अभियान प्रत्यक्षात कसे राबवण्यात येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.