फलटण | धैर्य टाईम्स | ११ जानेवारी २०२५
फलटण तालुक्यातील मौजे आळजापुर ग्रामपंचायत येथे दारूबंदी होण्यासाठी महिलांचे मतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
सदर मतदान आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दारूबंदी होण्यासाठी आळजापुर येथील महिला मतदारांचे मतदान संपन्न होत आहे. याची मतमोजणी त्याच ठिकाणी आज सायंकाळी 6 वाजल्यापासून होणार आहे.