Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

महावितरणच्या कारभाराला कंटाळून सामूहिकपणे वीज कनेक्शन व दुकाने बंद करण्याच्या व्यापाऱ्यांचा इशारा

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी:- शहरातील नाना पाटील चौक येथील भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक यांनी महावितरणच्या कारभाराला कंटाळून एकत्र येत सामूहिकपणे वीज कनेक्शन बंद करत दुकाने बंद करत असल्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व ऊर्जामंत्री तथा उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील दहा ते पंधरा दिवसापासून स्टेट बँक परिसर, शिव कॉम्प्लेक्स, बसस्टँड समोरची बाजू, नाना पाटील चौक या भागातील वीज पुरवठा संपूर्ण दिवस खंडित राहत आहे. सदरचा भाग हा मुख्य बाजारपेठेत असल्याने या भागात विजेची सतत गरज असते असे असताना महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक अडचणीत आले असून ऐन उन्हाळ्यामध्ये व्यवसायिकांना व्यवसाय करताना अनेक त्रासांना समोर जावे लागत आहे. महावितरणच्या सततच्या वीज खंडित पुरवठ्यामुळे अनेक व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून अनेक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

फलटण शहर महावितरणचे शाखा अभियंता व जनमित्र हे संबंधित भागात फिरकत नसल्याने तासनतास वीज पुरवठा तसाच खंडित राहत आहे सध्या एकीकडे बाजारपेठेमध्ये मंदीची सावट असल्याने व्यवसायिक अगोदरच त्रासलेले असून सततच्या वीज खंडित पुरवठ्यामुळे व्यवसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा महावितरण शाखा अभियंता व जनमित्र यांच्याकडे तोंडी तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारची दखल व दक्षता न घेतल्याने त्रासलेल्या व्यवसायिकांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या नावे निवेदन दिले असून यामध्ये वीज खंडित पुरवठ्यामुळे हैरान झाल्याने कंटाळून एकत्रित येत सामूहिकपणे वीज कनेक्शन बंद करून व्यवसाय बंद करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मागील अनेक महिन्यापासून शहरातील मूळ बाजारपेठेतील वीज समस्यांमध्ये वाढ झाली असून कोणताही महावितरण अधिकारी व जनमित्र याकडे लक्ष देत नसल्याने फलटणमधील व्यावसायिक ग्राहक त्रास असल्याचे निवेदनात म्हंटले आहे आता एकत्रित व्यवसायिकांनी महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बदल न झाल्यास सामूहिकपणे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वीज ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वीज खंडित करू नये अशी महावितरण वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असताना कोणतीही कल्पना न देता मागील पंधरा दिवसापासून सतत वीज खंडित होत आहे व सदस्या वीज खंडित पुरवठ्याकडे महावितरण शाखा अभियंता व जनित्र लक्ष देत नसल्याने रात्रीच्या वेळी ही वीजपुरवठा खंडित राहत आहे. व्यवसायिक वीज ग्राहकांना जलद व अखंडितपणे वीज सेवा देण्याचे महावितरणचे आदेश असताना फलटण शहरात वीज सेवा दिली जात नाही. फलटण शहरातील व्यवसायिकांनी वीज सेवा मिळत नसल्याने व्यवसायिकांनी दिलेल्या निवेदनामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व

ऊर्जामंत्री तथा उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महावितरणचे अधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महावितरण शाखा अभियंता अनिरुद्ध निमकर यांना व्यापारी निवेदन देण्यास गेले असता "हे निवेदन वरिष्ठांना पण नक्की द्या" असा खोचक सल्ला व्यापाऱ्यांना दिला यावरून महावितरण शाखा अभियंता अनिरुद्ध निमकर किती मुजोरपणे काम करत आहेत याचा प्रत्यय येतो.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER