धैर्य टाईम्स | फलटण |
विडणी ( ता. फलटण ) येथील लोकनियुक्त सरपंच सागर कांतीलाल अभंग यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण उत्कृष्ट सरपंच पुरस्कार-2025 जाहिर झाला आहे. डॉ. विशाखा सोशल वेलफेअर, टीम झेनिथ राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त महासंघाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय महिला संसदेचे आयोजन 09 मार्च 2025 रोजी करण्यात आले आहे. यावेळी पुरस्काराचे वितरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे विशेष समारंभात होणार आहे.
सागर अभंग यांना जाहिर झालेल्या या पुरस्काराबद्दल ना. जयकुमार गोरे, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री, मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.