फलटण प्रतिनिधी : मौजे सांगवी येथे फलटण ते बारामती रोडवर दुचाकीवरून निघालेल्या चालकास
पाठीमागून येणारी एसटी बस ने निष्काळजीपणे वेगात चालवून ओव्हरटेक करत असताना धक्का लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वराचा मृत्यू झाला असून या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमाराला मौजे सांगवी तालुका फलटण गावचे हद्दीत फलटण ते बारामती रोडवर हॉटेल निरा गार्डन जवळ नानासो रामचंद्र घनवट (वय ५८ वर्ष राहणार पवई माळ पणदारे ता. बारामती जि. पुणे) हे मोटर सायकल नंबर एम एच ४२ डी २१५३ वरून फलटणबाजू कडून बारामती बाजूकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून येणारी एसटी बस नंबर एम एच १४ बी टी ३५०५ वरील चालक रुपेश गंगाराम तोडकर (वय ३३ वर्षे) याने निष्काळजीपणे वेगात चालवून ओव्हरटेक करत असताना त्याचे एसटी बाजूच्या क्लीनर बाजूचे पाठीमागील चाका जवळचा धक्का लागून अपघात झाला असून त्यामध्ये नानासो रामचंद्र घनवट हे गंभीर जखमी होऊन त्यांच्या मृत्यूस बस चालक कारणीभूत झाला आहे अशी बस चालका विरूध्द फिर्याद संपत रामचंद्र घनवट ( रा. पवई माळ पणदारे ता. बारामती जि. पुणे) यांनी दिली असून याप्रकरणी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.उ.नि दीक्षित करत आहेत.