फलटण प्रतिनिधी :
राज्य घटनेला अभिप्रेत असणारी मूल्ये दुसऱ्यालादेण्या अगोदर तीमूल्ये स्वतःला प्राप्त करुन घ्यावी लागतात व आत्मसात करण्याचा सर्वोत्तम राजमार्ग म्हणजे शिक्षण होय तर शिक्षणाचा राजमार्ग हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितला असल्याचे गौ्रोदगार फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी काढले, ते फलटण येथे पत्रकारांच्या वतीने आयोजित विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक,फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, प्राचार्य रवींद्र येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस म्हणाले, स्वातंत्र्य व घटनेला अभिप्रेत असणारी मूल्ये आजचे सत्कारमूर्ती यांनी शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने प्राप्त करून घेतली आहेत याचे कौतुक करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी हे सत्कारमूर्ती असल्याचे सांगितले.
तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यावेळी बोलताना म्हणाले की,गरजू - गरीब यांच्यासाठी काम करताना त्यांना न्याय देत राज्यघटना कृतीतून जगता आली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजातील गरीब, पीडित वा सर्वांसाठीस आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल या पद्धतीने जर वाटचाल केली तर राज्यघटनेला अभिप्रेत असणारी उद्देश साध्य होतील व देश पुढे जाण्यामध्ये आपला हातभार लागेल असा विश्वास डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.
पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी यावेळी आपले विचारव्यक्त करताना म्हणाले की, राज्य घटनेवरच आपली निवड झाली आहे. आपण आज कोणात्याही क्षेत्रात काम करत असताना त्याच राज्य घटनेच्या माध्यमातून जे कायदे निर्माण झाले आहेत त्याच चौकटीत राहून आपण काम करणार असल्याचे सत्कारमूर्तिना यावेळी शहा यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांन पासून आपल्या पर्यंत ही नाळ जोडली गेली आहे. कोणत्याही क्षेत्रात लोकसेवा म्हणून काम करताना समाजाची सेवा करताना आपल्या कामाचा ठसा उठवण्याचे खरे आव्हान असल्याचे यावेळी शहा म्हणाले. माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात पुढील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले शुभांगी जगताप - कृषि सहाय्यक, संग्राम मोरे - पी. एस. आय., विशाल जगताप - पंजाब नॅशनल बँक, असिस्टंट मॅनेजर, प्रतीक आढाव - नायब तहसीलदार, शंकेश्वरा अहिवळे - इन्कम टॅक्स ऑफिसर,अजय मिसाळ पीएसआय, सनी बनसोडे उद्योग निरीक्षक, दिपाली जगताप पीएचडी, ॲड. प्रसाद काकडे, ॲड.शितल अहिवळे, ॲड.नम्रता अहिवळे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, ॲड. मेघा अहिवळे, ॲड. सुजित निकाळजे, ॲड.अमृता चव्हाण, ॲड.बापू शिलवंत - नोटरी म्हणून नियुक्ती, अनिकेत काकडे - सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, सागर अहिवळे लॉ ऑफिसर, दर्शन कांबळे इंडियन आर्मी, सोमनाथ काशीद - कृषि सहाय्यक, सुभाष निकाळजे -प्राथमिक शिक्षक, प्रणित कांबळे - पीएसआय, प्रा.डॉ. अविष्कार कांबळे - पी.एच.डी.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार वरिष्ठ युवा पत्रकार सचिन मोरे यांनी मानले.