फलटण प्रतिनिधी :
शैक्षणिक साहित्य खरेदी करून दुचाकीवरून घरी निघालेल्या बारामती तालुक्यातील निंबुत येथील युवा दाम्पत्याला तिघा अज्ञातांनी कोयत्याच्या धाकाने पाऊण लाखांचा ऐवज लुटल्याची घटना जाधववाडी गावच्या हद्दीतील योद्धा अकॅडमीच्या पुढे असलेल्या उतारावर मंगळवार दिनांक 3 जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या वर्षभरातील अशाप्रकारे लुटण्याची ही दुसरी घटना असून परिसरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी वैभव भीमराव बनसोडे (वय ३६, रा. निंबुत, ता. बारामती, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली. सविस्तर माहिती अशी, मंगळवार दिनांक 3 जून 2024 रोजी फलटण येथे वैभव व त्यांची पत्नी नीलम मुलीच्या किरकोळ शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आले होते. परत निंबुतकडे जाताना रात्री आठच्या सुमारास पाठीमागून पल्सरवर आलेल्या तिघा अज्ञातांनी गाडी आडवी मारून बनसोडे यांना
त्यानंतर त्यातील एकाने नीलम यांना मारहाण करत त्यांच्या गळ्याला कोयता लावून त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किंमतीची चेन, १० हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅमची अंगठी तर दुसऱ्या इसमाने १२ हजार २०० रुपये रोकड असलेली पर्स काढून घेतली तर तिसऱ्या इसमाने वैभव यांचा २८ हजारांचा मोबाईल, व नीलम यांचा १५ हजारांचा मोबाईल असा सुमारे ७५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लुबाडून दुचाकीवरून पोबारा केला. तपास सहायक निरीक्षक शिंदे करत आहेत.