फलटण प्रतिनीधी:- बरड येथील पशुसंवर्धन डॉ. दिलीप महादेव नाझीरकर यांचे विरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉ. दिलीप महादेव नाझीरकर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार,दिलीप महादेव नाझीरकर, (वय ५५ वर्षे) पशुधन विकास अधिकारी, डॉक्टर, वर्ग- ३ पशुसंवर्धन वैद्यकिय दवाखाना, श्रेणी-२ बरड, ता फलटण जि सातारा (रा. फ्लैट नं. १६ नारायण अपार्टमेंट, चिंचकर इस्टेट, टी.सी कॉलेजच्या पाठीमागे, बारामती ता. बारामती, जि.पुणे) विरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथे सुरू असलेल्या उघड चौकशीमध्ये दिलीप महादेव नाझीरकर यांनी दि. ११/०६/२०११ ते दि. ०७/०९/२०१९ या परिक्षण कालावधीमध्ये त्यांच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून ज्ञातस्त्रोतापेक्षा त्यांचे स्वताची एकुण १५ लाख ८४ हजार १७१ रूपये किंमतीची अपसंपदा (एकुण उत्पन्नाच्या २५.७ टक्के) गैरमार्गाने संपादीत केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस निरीक्षक विक्रम पवार, लाप्रवि, सातारा यांच्या फिर्यादीवरून दिलीप महादेव नाझीरकर यांचेविरूद्ध अपसंपदा बाळगल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं ६९०/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १३(१) (ई) सह १३ (२) तसेच धष्टाचार प्रतिबंधक सुधारित अधिनियम २०१८ चे कलम १३(१) (ब) सह १३ (२) अन्वये दिनांक ०२/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मार्गदर्शन अधिकारी राजेश वसंत वाघमारे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन अंकुश राऊत, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी याबाबत तपास केला असून भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लांकसेवकांबद्दल तक्रार असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, सि.स.नं. ५२४/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदर बझार, सातारा यांचे खालील संकेतस्थळ / क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क: www.achmaharashtra.net वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in फेसबुक पेज www.facebook.com-maharashtraACB कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२१६२/२३८१३९ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४, राजेश वसंत वाघमारे,पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारामो.नं.९५९४५३११००, ९७६३४०६५०० यांनी केले आहे.